JOIN US
मराठी बातम्या / मनी / Share Market : ड्रोन निर्मिती करणाऱ्या 'या' कंपन्यांचे शेअर वधारणार? सरकारच्या धोरणामुळे चांगल्या परताव्याची शक्यता

Share Market : ड्रोन निर्मिती करणाऱ्या 'या' कंपन्यांचे शेअर वधारणार? सरकारच्या धोरणामुळे चांगल्या परताव्याची शक्यता

भारतात ड्रोन बनवणार्‍या सर्वच कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध नसल्या तरी मोठ्या कंपन्यांची लिस्टिंग आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 4 कंपन्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या या क्षेत्रात काम करत आहेत आणि आगामी काळात त्यांची विक्री वाढण्याची दाट शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 फेब्रुवारी : भविष्यात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पानंतर (Budget 2022) स्पष्ट झालं आहे. भारत सरकारने यावेळी अर्थसंकल्पात पिकांवर फवारणीसाठी ड्रोनचा वापर करण्याबाबतही घोषणा केली आहे. याशिवाय ड्रोन बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पार्ट्स मागवता येत असले तरी विदेशातून ड्रोनच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत भारतात ड्रोन बनवणाऱ्या कंपन्या खुश आहेत. भारतात ड्रोन बनवणार्‍या सर्वच कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध नसल्या तरी मोठ्या कंपन्यांची लिस्टिंग आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 4 कंपन्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या या क्षेत्रात काम करत आहेत आणि आगामी काळात त्यांची विक्री वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर व्यवहार असू शकते. परंतु नेहमीप्रमाणे, लक्षात ठेवा की शेअर बाजार सर्व प्रकारच्या जोखमींच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. पारस डिफेन्स आणि स्पेस (Paras Defence and Space) ही कंपनी एक टियर 2 डिफेन्स इंजिनीअरिंग फर्म आहे जी सुरक्षिततेशी संबंधित अनेक प्रोडक्ट्स आणि सोल्युशन्स प्रोव्हाईड करते. कंपनीची उपकंपनी, पारस एरोस्पेस (Paras Aerospace) NCR मध्ये स्थित आहे आणि अलीकडेच इस्रायल, लॅटव्हिया आणि इटलीमधील UAV उत्पादन कंपन्यांशी करार केला आहे. UAV म्हणजे मानवरहित एरियल व्हेइकल (Unmanned Aerial Vehicle). अधिक सोप्या भाषेत सांगायचे तर अशी वाहने जी माणसांशिवाय आकाशात उडतात. ड्रोन जे खाली बसलेल्या व्यक्तीद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते आणि हवेत उडू शकते. त्यामुळे पारस एरोस्पेसची ही भागीदारी देशातील ड्रोन उत्पादकांमध्ये आघाडीवर म्हणून प्रस्थापित होण्यास मदत करेल. 11 फेब्रुवारीला बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचा शेअर NSE वर 671.25 रुपयांवर आहे. कंपनीचे मार्केट कॅप 2,617.88 कोटी आहे. यामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग 58.94 टक्के आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics) शेअर बाजारात ही कंपनी HAL म्हणून ओळखली जाते. ही सरकार नियंत्रित कंपनी आहे. पारस डिफेन्ससारखी संरक्षण उपकरणे बनवण्याचे कामही करते. कंपनीने इस्रायली UAV उत्पादकांशी देखील भागीदारी केली आहे. ही कंपनी भारतासाठी तेजस आणि भारतीय हवाई दलाची इतर विमाने बनवण्यात गुंतलेली आहे. शेअर बाजारावर त्यांचे वर्चस्व आहे. गेल्या 4 वर्षांपासून कंपनी सतत नफ्यात आहे. यामध्ये, DII आणि FII ची अनुक्रमे 18.25 टक्के आणि 3.15 टक्के हिस्सेदारी आहे. त्याची मार्केट कॅप 46,143.80 कोटी रुपये आहे. झेन टेक्नोलॉजी (Zen Technology) ही स्मॉल कॅप कंपनी संरक्षण क्षेत्रातही काम करते. ही कंपनी ड्रोन बनवते. कंपनी हेवी लिफ्ट लॉजिस्टिक ड्रोन आणि अँटी ड्रोन सिस्टम (ZADS) यांसारख्या ग्राहकांच्या गरजेनुसार ड्रोन तयार करते. प्रमोटर्सकडे सध्या कंपनीचा 60.19 टक्के हिस्सा आहे. चांगली गोष्ट म्हणजे ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून कंपनीच्या स्टॉकमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. 11 फेब्रुवारीला बाजार बंद झाल्यानंतर शेअरची किंमत प्रति शेअर 217.70 रुपये होती. रतन इंडिया एंटरप्रायझेस (RattanIndia Enterprises) ही कंपनी प्रामुख्याने वीजनिर्मिती आणि वितरणाचे काम करत होती, पण नंतर तिने ड्रोन व्यवसायातही काम सुरू केले आहे. त्याच्या ड्रोन व्यवसायासाठी, त्याने निओस्काय इंडियाची उपकंपनी स्थापन केली आहे. शहरी ड्रोन लॉजिस्टिक्स तयार करण्यासाठी कंपनी अमेरिकेत गुंतवणूक करण्याच्या योजनेवर काम करत आहे. 7,084.13 कोटी मार्केट कॅप असलेल्या या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, कंपनीच्या प्रमोटर्सकडे 74.8 टक्के हिस्सा आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) सुद्धा यामध्ये 9.03 टक्के हिस्सा ठेवतात. त्याचा स्टॉक 11 फेब्रुवारीला 51.25 रुपयांवर बंद झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या