JOIN US
मराठी बातम्या / मनी / शेअर मार्केटपेक्षा सोन्यामध्ये पैसे गुंतवलेल्यांना मोठा फायदा, पाहा नेमकं कसं?

शेअर मार्केटपेक्षा सोन्यामध्ये पैसे गुंतवलेल्यांना मोठा फायदा, पाहा नेमकं कसं?

जानेवारी महिन्यापासून आता सलग सोन्याचे दर वाढत आहे. सोन्याच्या किंमती 15 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

जाहिरात

share market

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : आर्थिक वर्ष 23 मध्ये सोन्याच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. दुसरीकडे शेअर बाजारात खूप जास्त अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजारापेक्षा सध्या सोन्यामध्ये चांगला फायदा लोकांना मिळत आहे. जानेवारी महिन्यापासून आता सलग सोन्याचे दर वाढत आहे. सोन्याच्या किंमती 15 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. आता आर्थिक वर्ष FY24 सराफासाठी आकर्षक दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढू शकतात. गेल्या आठवड्यात 31 मार्च रोजी, MCX सोने फ्युचर्स 5 जूनला परिपक्व होत आहेत. आर्थिक वर्ष 23 मध्ये, सोन्याचा भाव 295 किंवा 0.49 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​बंद झाला होता तज्ज्ञांच्या मते, गेल्या आर्थिक वर्ष 2023 मध्ये देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत 52000 ते 60000 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याने एकूण 15 टक्के परतावा दिला आहे. तर निफ्टीने FY23 मध्ये नकारात्मक परतावा दिला आहे. कारण रशिया-युक्रेन युद्धातून निर्माण झालेल्या जकीय तणावामुळे जागतिक पातळीवर महागाई दर वाढला.

3 महिन्यात सोन्याने दिले FD पेक्षा जास्त रिटर्न, आता काय असेल भाव? एक्सपर्ट सांगतात…

महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मंदीचे सावट आहे. ही परिस्थिती पाहता जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे भाव गगनाला भिडले.

सोन्याचा भाव 68000 पर्यंत पोहोचू शकतो सोन्याच्या किंमती साधारण 65 ते 68 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. US फेड रिझर्व्ह बँकेनं पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Gold-Silver Rate Today in Nagpur: सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा आजचे नागपुरातील भाव

संबंधित बातम्या

सोन्याच्या किमती पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजे FY24 पर्यंत पोहोचण्यापूर्वी सहज 66000-68000 पर्यंत पोहोचू शकतात. बाजारातील भावना तेजीत राहिल्यास सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 20 टक्क्यांपर्यंत चांगले रिटर्न मिळू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या