मुंबई, 5 मे : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली, मात्र आज बाजार या घसरणीनंतर पुन्हा पुढे जाण्यासाठी सज्ज झाला आहे. यूएस सेंट्रल बँक फेड रिझर्व्हने (Federal Reserve System) व्याजदरात वाढ केल्यामुळे, तिथल्या बाजारात मोठी उसळी आली आहे, ज्याचा परिणाम आज देशांतर्गत गुंतवणूकदारांवरही दिसून येईल. कालच्या व्यवहारात सेन्सेक्स 1,307 अंकांच्या घसरणीसह 55,669 वर बंद झाला, तर निफ्टी 392 अंकांच्या घसरणीसह 16,678 वर बंद झाला. कालच्या धक्क्यातून सावरल्यानंतर गुंतवणूकदार वाढत्या कंपन्यांकडे बघत असल्याने आजच्या व्यवसायात तेजी येण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांना जागतिक बाजारातील अनेक सकारात्मक घटकांचा लाभही मिळेल. Petrol Diesel Prices: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, चैक करा लेटेस्ट किमती अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर तेथील सर्व प्रमुख स्टॉक एक्स्चेंजमध्ये जबरदस्त उसळी आली. डाऊ जोन्स 932.27 (2.81 टक्के) अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर S&P 500 ने 124.69 (2.99 टक्के) अंकांची उसळी घेतली, जे दोन वर्षांतील सर्वोच्च आहे. याशिवाय नॅस्डॅक कंपोझिट 401.10 (3.19 टक्के) अंकांच्या वाढीसह बंद झाला. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) त्रस्त झालेल्या युरोपीय शेअर बाजारांमध्येही कालच्या व्यवहारात घसरण दिसून आली. जर्मनीचे शेअर बाजार 0.49 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले, तर फ्रेंच शेअर बाजाराने 1.24 टक्क्यांची घसरण दर्शवली. त्याचप्रमाणे लंडनचे शेअर बाजारही 0.95 टक्क्यांनी घसरून बंद झाले. LIC IPO साठी खास मोठा निर्णय; ‘या’ दिवशीही गुंतवणूकदारांना लावता येणार बोली आज आशियाई बाजार तेजीत अमेरिकन शेअर बाजाराच्या वाढीचा परिणाम आज आशियाई बाजारावरही दिसून येत आहे. सकाळी उघडलेल्या आशियातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसली आहे. सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमध्ये आज सकाळच्या व्यवहारात 0.96 टक्क्यांची उसळी होती. त्याचप्रमाणे हाँगकाँगच्या स्टॉक एक्स्चेंजमध्येही 1.41 टक्क्यांनी वाढ होत आहे. मात्र, दक्षिण कोरिया आणि जपानचे शेअर बाजार अद्याप उघडलेले नव्हते. परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरुच भारतीय शेअर बाजारातून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) विक्री सुरूच आहे. LIC चा मेगा IPO सुद्धा FII ला पैसे काढण्यापासून रोखू शकला नाही. मे 4 च्या ट्रेडिंगमध्ये, FII ने 3,288.18 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आणि यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. या कालावधीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 1,338 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले, परंतु ते बाजारातील घसरण रोखू शकले नाहीत.