मुंबई, 22 फेब्रुवारी : सुरक्षित गुंतवणुकीसाठी तुम्हीही मुदत ठेवचा (Fixed Deposit) चांगला पर्याय विचारात घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मे 2002 मध्ये SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदाने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास ऑफर आणली होती. या योजनेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे म्हणजेच तुम्ही आता मार्च 2022 पर्यंत उच्च व्याजदराचा लाभ घेऊ शकता. एसबीआय वीकेअर डिपॉझिट (SBI ‘Wecare Deposit’) SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘Wecare Deposit’ विशेष FD योजना आणली आहे. आता तुम्ही मार्च 2022 पर्यंत उच्च व्याजदराचा लाभ घेऊ शकता. यामध्ये सर्वसामान्यांना लागू होणाऱ्या दरांवरून 80 बेसिस पॉइंट अधिक व्याजाचा लाभ मिळत आहे. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष FD योजनेंतर्गत मुदत ठेव ठेवल्यास, FD वर लागू होणारा व्याज दर 6.20 टक्के असेल. Multibagger share: दोन रुपयांच्या स्टॉकची मोठी झेप; एक लाख बनले 1.81 कोटी ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी ठेवींवर 30 बेस पॉइंट अतिरिक्त प्रीमियम व्याज मिळते. पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या किरकोळ मुदत ठेवींवर सामान्य नागरिकांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या रिटेल मुदत ठेवींवर 0.80 टक्के (0.50 +0.30) अधिक व्याज मिळेल. HDFC बँक (HDFC Senior Citizen Care) एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिक सेवा सुरू केली. बँक या ठेवींवर 0.75 टक्के अधिक व्याज देते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एचडीएफसी बँक सीनियर सिटीझन केअर एफडी अंतर्गत मुदत ठेव केली तर, एफडीवर लागू होणारा व्याज दर 6.25 टक्के असेल. LIC च्या IPO संबंधित धोके काय? SEBI च्या नियामानेही वाढवली गुंतवणूकदारांची चिंता ICICI बँक (ICICI Bank Golden Years) आयसीआयसीआय बँकेने ICICI बँक गोल्डन इयर्स योजना सादर केली आहे, ही ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD योजना आहे. बँक या योजनेत 0.80 टक्के अधिक व्याज देत आहे. ICICI बँक गोल्डन इयर एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30 टक्के व्याजदर देत आहे. या योजनेचा लाभ 08 एप्रिल 2022 पर्यंत घेता येईल.