JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / SBI देत आहे सर्वात स्वस्त 'Green Car Loan', वाचा काय आहेत फायदे

SBI देत आहे सर्वात स्वस्त 'Green Car Loan', वाचा काय आहेत फायदे

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने इलेक्ट्रिक वाहनांसाठी (Electric Vehicles) एक स्पेशल ग्रीन कार लोन (Green Car Loan) लाँच केले आहे. वाचा सविस्तर

0106

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एक नवी योजना लाँच केली आहे. एसबीआयने इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्जयोजना लाँच केली आहे.

जाहिरात
0206

इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी लाँच करण्यात आलेले हे भारतातील पहिले ग्रीन कार लोन आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देणे या यामागचा हेतू आहे. (फोटो-न्यूज18)

जाहिरात
0306

या योजनेअंतर्गत कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 8 वर्षांसाठी कर्ज देण्यात येईल. एसबीआय ग्रीन कार लोन 0.20 टक्के कमी व्याज द्यावे लागेल. एसबीआय ग्रीन कार लोन अंतर्गत गाडीच्या‘ऑन-रोड प्राइस'वर 90 टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ज्यात नोंदणी, विमा आणि एक्सटेंडेड वॉरंटी, एकूण सेवा पॅकेज, वार्षिक देखभाल कराराचा आणि अॅक्सेसरीजचा खर्च यांचा समावेश आहे (फोटो-न्यूज18)

जाहिरात
0406

कुणाला मिळेल कर्ज? SBIच्या वेबसाइटनुसार केंद्र सरकारचे कर्मचारी, सैन्य आणि पॅरा मिलिटरी फोर्सचे कर्मचारी आणि संरक्षण उपक्रम करणार्‍या कर्मचार्‍यांना या सुविधेअंतर्गत कर्ज घेता येणार आहे. त्याचप्रमाणे Professionals, self-employed, businessmen यांंना देखील हे कर्ज दिले जाईल. कृषि आणि त्यासंबधित क्षेत्रातील व्यक्तींना देखील या योजनेअंतर्गत कर्ज मिळेल. (फोटो-न्यूज18)

जाहिरात
0506

कमीत कमी उत्पन्न 3 लाख असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. एसबीआयकडून त्यांना त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 48 टक्के कर्जाच्या रुपात मिळू शकेल. बिझनेसमन, प्रोफेशनल आणि खाजगी नोकरी करणाऱ्यांना आयटीआरमधील डेप्रीसिएशन आणि सर्व कर्जाचे पेमेंट जोडल्यानंतर संबधित व्यक्तीच्या ग्रॉस टॅक्सेबल इनकमच्या किंवा नेट प्रॉफिटच्या 4 टक्के कर्ज मिळू शकते. शेती क्षेत्राशी निगडीत व्यक्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न 4 लाख आहे, त्याना नेट वार्षिक उत्पन्नाच्या 3 टक्के कर्ज मिळू शकते. (फोटो-न्यूज18)

जाहिरात
0606

कोणती कागदपत्रे लागतील? मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट, 2 पासपोर्ट फोटो, ओळखपत्र, पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड, डीएल, लेटेस्ट सॅलरी स्लीप, फॉर्म 16, व्यापारी वर्ग किंवा अन्य व्यक्तींसाठी 2 वर्षाचा रिटर्न आणि कृषी क्षेत्रातील अर्जदाराला जमीनीचे कागद द्यावे लागतील (फोटो-न्यूज18)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या