स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) पेन्शनर्ससाठी एक खास वेबसाइट सुरू केली आहे. एसबीआयचे ज्येष्ठ नागरिक ग्राहक आता https://www.pensionseva.sbi/ या साइटवर जाऊन पेन्शनसंदर्भातील माहिती मिळवू शकतात.
अशाप्रकारे वापरा वेबसाइट- या वेबसाइटवर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्ही लॉग इन करून या वेबसाइटचा वापर करू शकता. ही वेबसाइट ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनसंदर्भातील अनेक कामं सुलभ करेल. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
वेबसाइटवर मिळतील खास सुविधा- स्टेट बँक ऑफ इंडियाने असं म्हटलं आहे की या वेबसाइटच्या माध्यमातून युजर्स एरिअर कॅलक्युलेशन शीट डाऊनलोड करू शकता आणि पेन्शन स्लीप किंवा फॉर्म 16 देखील डाऊनलोड करू शकता. याशिवाय पेन्शन प्रोफाइल डिटेल, गुंतवणुकीची माहिती आणि लाइफ सर्टिफिकेटचे स्टेटस देखील माहित करू शकता. बँकेत केलेल्या ट्रान्झॅक्शनची माहितीही याच वेबसाइटवर मिळू शकते.
कशाप्रकारे मिळतील फायदे- या वेबसाइटवर रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला विविध फायदे मिळतील. जेव्हा तुमच्या खात्यात पेन्शन येईल तेव्हा त्याची माहिती तुमच्या फोनवर दिली जाईल. ब्रांच लाइफ सर्टिफिकेटची सुविधा देखील मिळेल आणि पेन्शन स्लीप देखील मेलच्या माध्यमातून मिळेल. यासह स्टेट बँकेच्या कोणत्याही ब्रांचमध्ये तुम्ही लाइफ सर्टिफिकेट सबमिट करू शकता.
हेल्पलाइन क्रमांकावर करू शकता तक्रार- ही वेबसाइट वापरताना ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही समस्या येणार नाही. याकरता एसबीआयने एक हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. तुम्हाला या वेबसाइटवर कोणतीही समस्या आल्यास तुम्ही एक स्क्रीन शॉट काढून तक्रार support.pensionseva@sbi.co.in यावर मेल करू शकता.
याशिवाय तुम्ही 8008202020 या नंबरवर UNHAPPY टाइप करून SMS देखील करू शकता. शिवाय बँक कस्टमर केअर क्रमांक 18004253800/1800112211 किंवा 08026599990 देखील जारी केला आहे, ज्यावर कॉल करून तुम्ही समस्या सांगू शकता.