JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / SBI ने 42 कोटी ग्राहकांसाठी सुरू केली ATM मधून पैसे काढण्याची नवीन सुविधा, वाचा सविस्तर

SBI ने 42 कोटी ग्राहकांसाठी सुरू केली ATM मधून पैसे काढण्याची नवीन सुविधा, वाचा सविस्तर

देशातील सर्वात मोठी बँके असणाऱ्या SBI ने ग्राहकांसाठी ओटीपी आधारित पैसे काढण्याची (SBI OTP-based ATM cash withdrawal) सुविधा उपलब्ध करून दिली आहे

0108

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI-Reserve Bank of India) ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये तत्कालीन 18 सरकारी बँकांद्वारे एकूण 1,48,428 कोटींच्या फसवणुकीची 12,461 प्रकरणे सूचित करण्यात आली आहेत. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आरबीआयकडून ही माहिती मिळाली आहे. आरटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार या फसवणुकीची शिकार देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI-State Bank of India)झाली आहे. एसबीआयने 44,612.93 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या 6,964 प्रकरणांबाबत सूचित केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात या 18 सरकारी बँकाची जेवढी फसवणूक झाली आहे त्याच्या 30 टक्के रक्कम एसबीआयची आहे.

जाहिरात
0208

या दिवसात एसबीआयकडून त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावधानता बाळगण्यााचा इशारा देण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यांच्या ग्राहकांना या फ्रॉडपासून वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्राहकांना अलर्ट पाठवणारे काही ट्वीट एसबीआय (SBI) कडून शेअर केले जातात.

जाहिरात
0308

एसबीआयने फिशिंगबाबत सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक माहिती इंटरनेटवर शेअर करताना सावधानता बाळगण्याबाबत भाष्य केले आहे.

जाहिरात
0408

तुमचे खाते, बँंकिंग व्यवहार आणि वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी माणसाला देऊ नये, याबाबत एसबीआयकडून वारंवार सूचित करण्यात येते. त्याचप्रमाणे एसबीआयकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जात आहे.

जाहिरात
0508

देशातील सर्वात मोठ्या या बँकेने ग्राहकांसाठी ओटीपी आधारित पैसे काढण्याची (SBI OTP-based ATM cash withdrawal) सुविधा दिली आहे

जाहिरात
0608

अशी काही प्रकरणे समोर आले आहेत की, एटीएमच्या माध्यमातून क्लोनिंगचा वापर करत ग्राहकांची माहिती चोरी केली जाते. डुप्लिकेट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना फसवले जाते. एटीएममधून पैसे काढण्याची ही सुविधा सुरक्षित व्हावी याकरता एसबीआय ग्राहकांना ओटीपी आधारित पैसे काढण्याचा (SBI OTP-based ATM cash withdrawal) पर्याय देत आहे.

जाहिरात
0708

एसबीआयच्या या सुविधेअंतर्गत कोणताही ग्राहक रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत 10 हजार रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम काढत असेल, तर त्याला ओटीपी विचारण्यात येत आहे. तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर हा ओटीपी येईल.

जाहिरात
0808

तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर आलेला ओटीपी टाकून तुम्ही 10 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढू शकता. ओटीपी एटीएममध्ये टाकल्यानंतरच तुम्हाला ही रक्कम काढता येईल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या