देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी 7 प्रकारचे डेबिट/एटीएम कार्ड जारी करते. या वेगवेगळ्या कार्डांसाठी प्रतिदिन पैसे काढण्याठी लिमिट वेगवेगळी आहे
SBI क्लासिक डेबिट कार्ड - हे कार्ड देशांतर्गतच वापरता येते. याचा वापर करून प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा 20000 रुपये आहे. कमीत कमी मर्यादा 100 रुपये आहे. या कार्डावर इन्श्यूरन्स चार्ज नाही आहे. यावर वार्षिक मेंटेनन्स शुल्क 125 रुपये प्लस जीएसटी आहे.
SBI गोल्ड इंटरनॅशनल डेबिट कार्ड- या कार्डमधून भारतात एटीएममधून प्रतिदिन कमीतकमी 100 ते जास्तीत जास्त 50000 रुपये काढता येऊ शकतात. अन्य देशात 50000 रुपये एवढीच किंमत त्या त्या देशातील चलनानुसार काढता येईल. यामध्ये इन्शूरन्स शुल्क 100 रुपये प्लज जीएसटी तर वार्षिक मेंटेनन्स शुल्क 175 रुपये प्लस जीएसटी आहे.
SBI प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड- या कार्डमधून भारतात एटीएममधून प्रतिदिन कमीतकमी 100 ते जास्तीत जास्त 1 लाख रुपये काढता येऊ शकतात. यामध्ये इन्शूरन्स शुल्क 100 रुपये प्लज जीएसटी तर वार्षिक मेंटेनन्स शुल्क 175 रुपये प्लस जीएसटी आहे.
SBI मुंबई मेट्रो कॉम्बो कार्ड- या कार्डमधून भारतात एटीएममधून प्रतिदिन कमीतकमी 100 ते जास्तीत जास्त 40000 रुपये काढता येऊ शकतात. मिनिमम डेली कॅश विथड्रॉल परदेशात वेगवेगळ्या एटीएममध्ये वेगवेगळी असू शकते. यामध्ये इन्शूरन्स शुल्क 100 रुपये प्लज जीएसटी तर वार्षिक मेंटेनन्स शुल्क 175 रुपये प्लस जीएसटी आहे.
sbiINTOUCH टॅप अँड गो डेबिट कार्ड- या कार्डमधून भारतात एटीएममधून प्रतिदिन कमीतकमी 100 ते जास्तीत जास्त 40000 रुपये काढता येऊ शकतात. या कार्डाचे वार्षिक मेंटेनन्स शुल्क 175 रुपये प्लस जीएसटी आहे.
SBI ग्लोबल इंटरनॅशनल आणि SBI माय कार्ड इंटरनॅशनल डेबिट कार्ड- या दोन्ही कार्डमधून भारतात एटीएममधून प्रतिदिन कमीतकमी 100 ते जास्तीत जास्त 40000 रुपये काढता येऊ शकतात. या कार्डाचे वार्षिक मेंटेनन्स शुल्क 175 रुपये प्लस जीएसटी आहे. ग्लोबल इंटरनॅशनल कार्डावर इन्शूरन्स शुल्क नाही आहे मात्र माय कार्ड इंटरनॅशनल डेबिट कार्डावर इन्शूरन्स शुल्क 250 रुपये प्लज जीएसटी आहे.