JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / SBI अलर्ट! कोट्यवधी ग्राहकांना बँकेचा इशारा, खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्या या सूचना

SBI अलर्ट! कोट्यवधी ग्राहकांना बँकेचा इशारा, खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्या या सूचना

Tips for safe ATM transaction: देशातील सर्वात मोठ्या बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत

0108

एटीएममधून (ATM) पैसे काढणे सोपे आणि सुविधापूर्ण आहे. मात्र यासंबंधीत काही फ्रॉड देखील समोर येत आहेत. अशावेळी डेबिट किंवा एटीएम कार्डाचे सुरक्षितपणे वापर करणे आणि एटीएममध्ये व्यवहार करताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

जाहिरात
0208

देशातील सर्वात मोठ्या बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत.

जाहिरात
0308

एसबीआयने ग्राहकांना कोणत्याही एटीएम-कम-डेबिट कार्ड फसवणुकीपासून वाचण्यासाठी पूर्णपणे गोपनीयता बाळगत व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे. एटीएम कार्ड आणि त्याचा पिन किती आवश्यक आहे हे सांगणारे ट्वीट SBI ने केले आहे.

जाहिरात
0408

लक्षात ठेवा या सेफ्टी टिप्स- एटीएम किंवा पीओएस मशीनवर एटीएमचा वापर करताना कीपॅड तुमच्या हाताने झाकून घ्या.

जाहिरात
0508

तुमचा पिन किंवा कार्ड डिटेल कधी कुणाबरोबर शेअर करू नका. त्याचप्रमाणे तुमच्या कार्डवर देखील कधी पिन लिहू नका.

जाहिरात
0608

तुमचे कार्ड डिटेल्स किंवा पिनबाबत माहिती देणाऱ्या कोणत्याही मेल, एसएमएस किंवा कॉल्सना उत्तर देऊ नका

जाहिरात
0708

तुमचा जन्मदिवस, फोन किंवा खात्याच्या क्रमांकांचा वापर पिन म्हणून करू नका. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्याची पावती देखील डिस्पोज करा किंवा सुरक्षितपणे दूर ठेवा. व्यवहार सुरू करण्यासाठी एटीएममध्ये काही छुपे कॅमेरा आहेत का तपासा

जाहिरात
0808

एटीएमचा वापर करताना किपॅड मॅनीप्युलेशन, हिट मॅपिंग, आणि शोल्डर सर्फिंगपासून सावधान राहा. तुमच्या मोबाइलवर येणारे ट्रान्झॅक्शन अलर्टसाठी साइन अप करा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या