JOIN US
मराठी बातम्या / मनी / 'या' बँकांमध्ये बचत खातं असल्यास होणार फायदा, 7 टक्क्यांपर्यंत मिळणार व्याज

'या' बँकांमध्ये बचत खातं असल्यास होणार फायदा, 7 टक्क्यांपर्यंत मिळणार व्याज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षभरात व्याजदरांमध्ये (Policy Rates) मोठ्या प्रमाणत कपात केली आहे. मात्र काही कमी फायनान्स (Small Finance Bank) असणाऱ्या बँकांमध्ये जर तुमचं बचत खातं असेल तर 7 टक्क्यापर्यंत व्याज मिळू शकतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : देशामध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. अशावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षभरात व्याजदरांमध्ये (Policy Rates) मोठ्या प्रमाणत कपात केली आहे. त्यामुळे देशभरातील विविध बँकांनी बचत खात्यावरील (Savings Account) व्याजदरामध्ये कपात केली आहे. मुख्यत: बचत करण्यासाठी बचत खात्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. यामध्ये असणाऱ्या मिनिमम बॅलन्स ठेवण्यासाठी प्रत्येक बँकांचे नियम वेगवेगळे असतात. दरम्यान काही कमी फायनान्स असणाऱ्या बँकांमध्ये जर तुमचं बचत खातं असेल तर 7 टक्क्यापर्यंत व्याज मिळू शकतं. कोणत्या आहेत या बँका जाणून घेऊयात. IDFC क: IDFC बँकेतील बचत खात्यामध्ये 1 लाख रुपये किमान शिल्लक असल्यास 6 टक्के दराने व्याज मिळते. तर या बँकेच्या बचत खात्यामध्ये 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास 7 टक्के दराने तुम्हाला व्याज मिळेल. हा व्याजदर वार्षिक आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बक: या बँकेतील बचत खात्यामध्ये 25 लाख रुपयांवर 7 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते. तर या बँकेत तुम्ही 25 लाख रुपयांपासून 10 कोटीपर्यंत रक्कम ठेवल्यास वार्षिक व्याजदर 7.25 टक्के आहे. 10 कोटींपेक्षा जास्त रकमेवरील व्याजदर 7.75 टक्के आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बक: या बँकेच्या बचत खात्यामध्ये 5 लाख रुपये असल्यास, वार्षिक व्याज दर 4 टक्के आहे. 5 लाखांपासून 50 लाख रुपयांपर्यंत रक्कम तुमच्या खात्यामध्ये असल्यास 5.50 टक्के व्याज मिळते. त्याचप्रमाणे जर या बँकेच्या बचत खात्यामध्ये 50 लाख रुपये ते 5 कोटी रुपयांपर्यंत रक्कम असेल तर मिळणारा व्याजदर 6.75 टक्के आहे.  5 कोटींपेक्षा जास्त रकमेवर मिळणारा व्याजदर 7 टक्के आहे. इक्विटास स्मॉल फा****यनान्सा क:  या स्मॉल फायनान्स बँकेच्या बचत खात्यामध्ये 1 लाख रुपये असल्यास  4.50 टक्के व्याजदर आहे. खात्यातील रक्कम जशी वाढेल तसं व्याजदरातही वाढ होईल. या बँकेतील बचत खात्यामध्ये 1 लाख रुपयांपासून 1 कोटीपर्यंत रक्कम असल्यास 6 टक्के, 1 कोटींपासून 5 कोटी रुपये रक्कम असल्यास 7 टक्के तर 5 कोटी ते 30 कोटींपर्यंत रक्कम असल्यास 7.25 टक्के व्याजदर आहे. SBI म****ध्ये व्याजदर 3 टक्के व्याजदर   कमी आर्थिक उलाढाल असणाऱ्या या बँकांमध्ये व्याजदर अधिक आहे, मात्र अनेक मुख्य बँकांमध्ये व्याजदर अत्यल्प आहे. भारतीय स्टेट बँक (State Bank of India) मध्ये 1 लाख रुपये रक्कम ठेवल्यास 3.25 टक्केच व्याजदर आहे.  1 लाखांपेक्षा अधिकच्या डिपॉझिटवर 3 टक्के व्याज मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या