JOIN US
मराठी बातम्या / मनी / दरमहा 300 रुपयांची बचत करून जमा करा 10 लाखांचा फंड, वाचा कशाप्रकारे कराल गुंतवणूक?

दरमहा 300 रुपयांची बचत करून जमा करा 10 लाखांचा फंड, वाचा कशाप्रकारे कराल गुंतवणूक?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास त्यातून चांगले रिटर्न्स मिळतात. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा दोन्ही कालावधीकरिता यात गुंतवणूक करता येते. जोखीम असली तरी अपेक्षित रिटर्न्स मिळण्याची शक्यता अधिक असते. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’ (SIP) हा पर्याय सर्वोत्तम ठरतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 फेब्रुवारी: भविष्यकाळातल्या गरजांसाठी प्रत्येक जण गुंतवणुकीवर (Investment Tips) भर देतो. यासाठी बॅंकेच्या पारंपरिक योजनांसह नव्या पर्यायांचा विचारही केला जातो. अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडातल्या (Mutual Fund Investment) गुंतवणुकीकडे अनेकांचा कल वाढला आहे. अर्थात त्यामागे अनेक कारणंदेखील आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास त्यातून चांगले रिटर्न्स मिळतात. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा दोन्ही कालावधीकरिता यात गुंतवणूक करता येते. जोखीम असली तरी अपेक्षित रिटर्न्स मिळण्याची शक्यता अधिक असते. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’ (SIP) हा पर्याय सर्वोत्तम ठरतो. स्मार्ट मनी मेकिंगच्या (Smart Money Making) माध्यमातून एखादी व्यक्ती 10 रुपयांची गुंतवणूक करून आपली संपत्ती 10 लाख रुपयांपर्यंत पोहोचवू शकते. रोज 10 रुपयांची बचत केली, तर ती महिन्याला 300 रुपये होते. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच ‘एसआयपी’मध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडला, तर पुढील 30 वर्षांत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम कमवू शकता. SIP मध्ये गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो आणि दीर्घ मुदतीत जास्त रिटर्न्स मिळण्याचीदेखील शक्यता असते. हे वाचा- EPFO : 50 लाख सदस्यांनी केले E-Nomination; मिळतात अनेक फायदे, तुम्ही केलं का? एसआयपी म्हणजे काय? एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. एसआयपी अगदी बॅंकेच्या आरडीसारखी (RD) असते. परंतु, त्यात बॅंकेपेक्षा चांगला रिटर्न मिळतो. दर महिन्याला तुमच्या बॅंक खात्यातून एक निश्चित रक्कम कापली जाते आणि ती एसआयपीमध्ये गुंतवली जाते. दररोजची एसआयपी (Daily SIP) व्यावसायिक किंवा जिथे दररोज उत्पन्न मिळतं, अशा व्यवसायाशी संबंधित व्यक्तींसाठी दररोजची एसआयपी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. दररोजच्या एसआयपीमध्ये तुम्हाला मिळणारा रिटर्न हा फंड व्यवस्थापनावर म्हणजेच ते तुमचे पैसे कोणत्या फंडात गुंतवतात यावर अवलंबून असतो. लार्ज कॅप फंडातला (Large Cap Fund) रिटर्न हा एकसमान असतो, त्यामुळे अशा फंडातली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. हे वाचा- घरी रोख रक्कम ठेवण्याचेसुद्धा आहेत खास नियम, जाणून घ्या अन्यथा पडू शकतं महागात साप्ताहिक एसआयपी (Weekly SIP) साप्ताहिक एसआयपीमधल्या गुंतवणुकीचा हप्ता तुमच्या बॅंक खात्यातून महिन्यातून चार वेळा कापला जातो. यात तुम्ही छोटी रक्कम गुंतवत असता. यामुळे मार्केटची जोखीम कमी होते. जेव्हा बाजार डाउन असतो तेव्हा साप्ताहिक एसआयपीमधून जास्त युनिट्स मिळतात. मासिक एसआयपी (Monthly SIP) लहान गुंतवणूकदार आणि नोकरदार वर्गासाठी मासिक एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय आहे. याचं व्यवस्थापन खूप सोपं असतं. या माध्यमातून तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या