मुंबई, 21 जानेवारी : सरकारच्या नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (SAIL) चालू आर्थिक वर्षाच्या (Financial Year) तिसऱ्या तिमाहीत आपल्या गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. यामुळेच बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनीही या कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. सेलने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत आपल्या गुंतवणूकदारांना शून्य परतावा दिला आहे. या तिमाहीत कंपनीची प्रति शेअर किंमत 113.65 रुपयांवरून 107.20 रुपयांपर्यंत घसरली. ही खराब कामगिरी पाहता राकेश झुनझुनवाला यांनी कंपनीतील आपली भागीदारी 1.76 टक्क्यांवरून 1.09 टक्क्यांवर आणली आहे. त्यांच्याकडे कंपनीचे एकूण 7.25 कोटी शेअर्स होते, ते आता 4.5 कोटींवर आले आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर कंपनीच्या एका शेअरची किंमत 30 सप्टेंबर रोजी 113.65 रुपये होती, जी डिसेंबर अखेरीस 107.20 रुपयांवर आली आहे. याचा अर्थ झुनझुनवाला यांनी अवघ्या एका तिमाहीत कंपनीचे 2.75 कोटी शेअर्स विकले आहेत. Paytm शेअर विक्रमी नीच्चांकी पातळीवर, IPO गुंतवणूकदारांचे 10 अब्ज डॉलर नुकसान राकेश झुनझुनवाला यांनी अलीकडेच लिस्टिंग झालेली कंपनी जुबिलंट इंग्रेव्हियामधील (Jubilant Ingrevia) 0.81 टक्के हिस्सा म्हणजेच 13 लाख शेअर्स विकले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांहून अधिक घसरले. या शेअर्सची किंमत 9.44 कोटी रुपये होती, तर आता त्यांच्याकडे कंपनीचे 50 लाख शेअर्स आहेत जे 3.14 टक्के शेअर्स इतके आहेत. Share Market : ‘या’ स्टॉक्सवर शेअर बाजारातील तज्ज्ञांची नजर; 45 टक्क्यांपर्यंत रिटर्नची अपेक्षा या कंपनीत हिस्सेदारी वाढवली राकेश झुनझुनवाला यांनी देशातील आघाडीची वाहन कंपनी टाटा मोटर्समधील त्यांची हिस्सेदारी 0.07 टक्क्यांनी वाढवली आहे. त्यांच्याकडे आता कंपनीचे 3.92 कोटी पेक्षा जास्त शेअर्स आहेत जे 1.18% स्टेकच्या समतुल्य आहेत. मोठ्या बदलांनंतर, त्याच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे 38 मजबूत स्टॉक शिल्लक आहेत.