मुंबई, 24 फेब्रुवारी: रशिया-युक्रेन संघर्षाच्या (Russia -Ukraine war) पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 24 फेब्रुवारी 22 ला 100 डॉलर झाली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनच्या डोनबास प्रांतात स्पेशल मिलिटरी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कच्च्या तेलाच्या (Crude Oil Prices hits $100) किमती वाढल्या आहेत. भारतातील प्रक्रिया केलं जाणारं 85 टक्के कच्चं तेल हे आयात केलेलं असतं, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या दरवाढीचा फटका भारतालाही बसणार आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाची ही सर्वोच्च किंमत ठरली आहे. अर्थात मोदी सरकार (Modi Government in India) सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. रशियानं पूर्व युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली असून त्यांच्या संरक्षणासाठी आपलं सैन्य पाठवण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेनमधील संकटाच्या तीव्रतेमुळं जगभरातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन वादाचा परिणाम तेलाच्या वाढलेल्या किंमतींच्या रुपात दिसत आहे. हे वाचा- Petrol Diesel Prices Today: आज पेट्रोल-डिझेल रेट स्थिर,तपासा आजचा लेटेस्ट भाव काय होणार परिणाम? कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईचा दर वाढेल, विविध उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढतील, त्याचबरोबर वाहतूक खर्च वाढेल. आयातीचा खर्च वाढल्यामुळे एकूणातच सगळ्याच किमती वाढण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने महागाई वाढेल असा अंदाज 2021-22 च्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनेटरी पॉलिसी समितीने कच्च्या तेलाच्या दरवाढीवर लक्ष ठेवलं आहे या समितीच्या अंदाजाने ही किंमत 70 ते 75 डॉलर प्रतिबॅरल जाईल अशी अपेक्षा होती. बजेटमध्येही याचा उल्लेख केला गेला होता. हे वाचा- Gold Price Today: रशिया-युक्रेन युद्धाचा सोने दरावर मोठा परिणाम,आज भाव 51000 पार इंडियन बास्केट क्रुड ऑईलची 16 फेब्रुवारीला फ्री ऑन बोर्ड (FOB) किंमत 94.68 डॉलर प्रतिबॅरल होती. इंडियन बास्केटमध्ये ओमान, दुबई किंवा ब्रेंट क्रुड ऑईलसह (Brent Crude Oil) इतर तेलांच्या ब्लेंडचा समावेश होतो. केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2021 ला पेट्रोल, डिझेलवरची एक्साईज ड्युटी कमी केली होती त्यानंतर सरकारने त्याच्या किमतींत बदल केलेले नाहीत. राज्य सरकारांनी व्हॅट कमी केल्याने नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर 21 मध्ये कमी झाल्या होत्या पण त्या जानेवारी 2022 मध्ये पुन्हा वाढल्या. FOB ची किंमत नोव्हेंबरमध्ये 80.64 डॉलर प्रतिबॅरलवरून डिसेंबरमध्ये 73.30 डॉलर प्रतिबॅरलवर आली होती ती जानेवारी 22 मध्ये 84.87 डॉलर प्रतिबॅरलवर आली होती. 2014 नंतरचा सर्वोच्च दर गुरुवारच्या आधी, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 95 डॉलर्सच्या आसपास होती. ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत 3.7 टक्क्यांनी वाढून 98.87 डॉलर्सवर गेली होती. ही किंमत सतत बदलत राहते. अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड देखील 4.8 टक्क्यांनी वाढून 95.48 डॉलर्सवर पोहोचलं आहे. डे ट्रेडिंगमध्ये (Day Trading) त्याची किंमत प्रति बॅरल 96 डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. 2014 नंतरची ही सर्वोच्च किंमत आहे. हे वाचा- रशिया-युक्रेन युद्ध सुरू, रशियाकडून अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले,हल्ल्याचा पहिला VIDEO संकटाची स्थिती कायम अमेरिका आणि त्याचे युरोपीय मित्र देश रशियावर नवीन निर्बंध लादण्यास तयार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पूर्व युक्रेनमधील दोन स्वतंत्र भागात सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं ब्रिटन रशियावर कठोर आर्थिक निर्बंध (Economic Restrictions) लादणार असल्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी सांगितलं आहे. ‘निर्बंध केवळ डोनबास, लुहान्स्क आणि डोनेस्तक येथील संस्था लक्षात घेऊनच लादले जाणार नाहीत तर रशियादेखील त्यांच्या कक्षेत असेल. आम्ही शक्य तितक्या प्रमाणात रशियाच्या आर्थिक हितांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू, असं जॉन्सन म्हणाले आहेत. महागाई वाढ आणि व्यापाराचा असमतोल कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा सर्वच उद्योगांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसोबतच ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील सुविधांसाठीही नागरिकांना जादा पैसे खर्च करावे लागू शकतात. एअरलाईन्सचं इंधन महाग झाल्याने त्यांचे दर वाढू शकतात तसंच रेल्वेचा प्रवासही महाग होऊ शकतो. आयात-निर्यातीचा जो समतोल सरकार राखण्याचा प्रयत्न करत असतं तो समतोलही या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे बिघडू शकतो. रेटिंग एजन्सी ICRA च्या प्रमुख इकॉनॉमिस्ट आदिती नायर यांनी आपल्या लेखात म्हटलंय होतं की भारताचं करंट अकाउंट डेफिसिट ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 मध्ये कमी होईल आणि ते जानेवारी ते मार्च 2022 पर्यंत 15 ते 17 बिलियन डॉलर इतकं होईल. हे वाचा- Russia Ukraine War: युक्रेनची राजधानी कीवमध्ये धमाके, रशियाकडून एअरपोर्ट बंद युरोपियन युनियनमधील (European Union) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही रशियावर निर्बंध लादले आहेत, अशी माहिती युनियनच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी दिली. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइल मार्केटवर झाला आहे. ऑइल ब्रोकर पीव्हीएमचे (PVM) तमास वर्गा म्हणाले की, ‘कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100डॉलर्सच्या वर जाण्याच्या शक्यतांना मोठी चालना मिळाली आहे. अशा रॅलीवर पैज लावणाऱ्यांनी तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.’ कोरोना महामारीचा कहर थांबल्यानंतर जगातील सर्व देशांमध्ये तेलाची मागणी वाढली आहे. त्यामुळे आधीच पुरवठ्याच्या पातळीवर काही समस्या असल्यानं तेलाचे भाव वाढत होते. सध्या कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळ आहेत. युक्रेनच्या संकटामुळं तेलाच्या वाढलेल्या किमतींमध्ये आणि मागणीत भर पडू शकते. रशिया-युक्रेन वादामुळं ऑइल सप्लायशी (Oil Supply) संबंधित असलेल्या समस्यांमध्ये भर घातली आहे. सौदी अरेबियानंतर रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल निर्यातदार (Oil Exporter) देश आहे. याशिवाय तो नैसर्गिक वायूचा (Natural Gas Producer) सर्वात मोठा उत्पादक देश आहे. ऑइल मार्केटमधील रशियाचं वर्चस्व हेच सप्लाय क्रायसिस निर्माण होण्याचं कारण ठरू शकतं. जर रशियावर निर्बंध लादले गेले तर त्याठिकाणावरून तेल आणि वायूचा पुरवठा होणार नाही. यामुळं ऑइल मार्केटमध्ये टंचाई निर्माण होईल आणि पर्यायानं किंमती वाढतील. या सर्व गोंधळाच्या दरम्यान, तेलाचा पुरवठा अधिक वेगवान करण्याच्या मागणीला ओपेक प्लस (OPEC+) या पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेनं आणि इतर सहकारी संघटनांनी विरोध केला आहे.