मुंबई: रुपयाने गेल्या २० वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. रुपया आणखी घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सर्वात नीचांकी स्तरावर पोहोचलं आहे. तेलाच्या वाढत्या किमती, कॉर्पोरेट डॉलरची मागणी आणि फेडरल रिझर्व्हच्या तेजीची वाढती भीती यामुळे शुक्रवारी भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळी गाठली.
डॉलरच्या तुलनेत रुपया 0.4% घसरून 82.356 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. या आठवड्यात सलग चौथ्या आठवड्यात सुमारे 0.8% नुकसान होणार आहे. याचा आंतरराष्ट्रीय आणि आशियातील शेअर मार्केटवर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो.
जगातील सर्वात जास्त कच्चे तेल भारतात आयात केलं जातं. जगातील देशांमध्ये भारताचा तिसरा नंबर लागतो. या आठवड्यात तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम रुपया आणि डॉलरवर झाला आहे. तेलाच्या गरजेपैकी सुमारे 80% आयात करतो. परिणामी महागाई मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.