JOIN US
मराठी बातम्या / मनी / Jioचा मोठा धमाका! Hotstar, Netflix, Amazon Prime पाहण्यासाठी वेगळ्या सबस्क्रिप्शनची गरज नाही; एकाच रिचार्चवर सर्वकाही फ्री

Jioचा मोठा धमाका! Hotstar, Netflix, Amazon Prime पाहण्यासाठी वेगळ्या सबस्क्रिप्शनची गरज नाही; एकाच रिचार्चवर सर्वकाही फ्री

ज्यांना ओटीटी प्लॅटफॉर्म वापरायचे आहेत, त्यांनी जिओच्या प्लॅन्सचा वापर केल्यास, कोणत्याही वेगळ्या सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही. म्हणजेच, एकाच रिचार्जमध्ये कॉलिंग, इंटरनेट आणि ओटीटी सबस्क्रिप्शन असा तिहेरी फायदा जिओ देत आहे.

जाहिरात

Jio च्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्ही सर्व OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 एप्रिल : सध्या सर्व गोष्टी महाग होत असताना, टेलिकॉम कंपनी जिओने (Jio offers) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने 600 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दोन धमाकेदार प्लॅन्स (Jio OTT plans) लाँच केले आहेत. या प्लॅन्समध्ये हायस्पीड डेटासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platforms) अधिक लक्ष देण्यात आलं आहे. या प्लॅन्सचे वैशिष्ट्य म्हणजे, जिओचा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मचे वेगळे सबस्क्रिप्शन (Reliance Jio Plans) घेण्याची गरज भासणार नाही. जाणून घेऊयात कोणते आहेत हे प्लॅन्स आणि, काय मिळतील फायदे. 399 रुपयांचा प्लॅन रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा (Reliance jio 399 Plan) प्लॅन हा त्या लोकांसाठी उत्तम आहे ज्यांना ओटीटी प्लॅटफॉर्म्सची गरज आहे. यामध्ये 75 जीबी हायस्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग, 100 दिवस 100 फ्री एसएमएस अशा सुविधा मिळतात. यासोबत यात डिझ्नी+हॉटस्टार (Disney+Hotstar), एका वर्षासाठी अमेझॉन प्राईम (Amazon Prime Video) व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स (Netflix) अशा तिन्ही ओटीटींचे फायदे (Jio 399 plan benefits) मिळतात. तसेच, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि इतर जिओ ॲप्सचा मोफत ॲक्सेस मिळतो. या प्लॅनमधील 75 जीबी हायस्पीड डेटा संपल्यानंतर प्रति GB 10 रुपये चार्ज पडतो. Google वर येणार नवीन फीचर्स, आता प्रवास करणं पूर्वीपेक्षा होणार सोपं 599 रुपयांचा प्लॅन जिओचा 599 रुपयांचा प्लॅन (Reliance Jio 599 plan) हा ओटीटी आणि भरपूर डेटा अशा दोन्ही सुविधा देतो. यामध्ये 100 जीबी हायस्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कला अनलिमिटेड कॉलिंग, आणि दररोजचे 100 मोफत एसएमएस अशा सुविधा मिळतात. यासोबतच या प्लॅनमध्ये 200 जीबी डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळते. तसेच, डिझ्नी+हॉटस्टार, एका वर्षासाठी अमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स अशा तीन ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन (Jio 599 plan benefits) यात मिळतं. याव्यतिरिक्त जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमासोबत इतर जिओ ॲप्सचा फ्री ॲक्सेसही मिळतो. Call Drop बाबत सरकार गंभीर, टेलिकॉम कंपन्याचे लायसन्स रद्द करण्याची तयारी एकूणच, ज्यांना ओटीटी प्लॅटफॉर्म वापरायचे आहेत, त्यांनी जिओच्या या प्लॅन्सचा वापर केल्यास, कोणत्याही वेगळ्या सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही. म्हणजेच, एकाच रिचार्जमध्ये कॉलिंग, इंटरनेट आणि ओटीटी सबस्क्रिप्शन (Jio Plans for OTT) असा तिहेरी फायदा जिओ देत आहे. काही दिवसांपूर्वीच जिओसह इतर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लॅन्सचे दर वाढवले होते. त्यानंतर आता जिओने आपल्या ग्राहकांना या प्लॅन्सच्या माध्यमातून दिलासा दिला आहे. मोबाइल वापरकर्ते जिओच्या या प्लॅनला चांगला प्रतिसादही देत आहेत. त्यामुळे स्पर्धेत पुन्हा जिओला आपला कस्टमर बेस आपल्याकडे खेचण्यात मदत नक्कीच होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या