Recharge
मुंबई : आधीच महागाईच्या झळा जास्त बसत असताना आता टेलिकॉम कंपनीने एक मोठा बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. टेलिकॉम कंपनीने व्हॅलिटिचं लिमिट कमी केलं आहे. याचा परिणाम ग्राहकांना एकदा नाही तर महिन्यातून दोन वेळा मारावा लागू शकतो हे देखील तेवढंच खरं आहे. Vodafone Idea कंपनीने 99 आणि 128 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली. कंपनीने प्रत्येक ग्राहकामागचा (ARPU) वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. Vi गेल्या काही काळापासून ARPU वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विडाफोन आयडियाचा कॉर्टर 4 मधील परफॉरमन्स पाहता शेअर मार्केटमध्ये तो मागील तिमाहीत 135 रुपयांवर राहिला.
Vodafone Idea ने लॉन्च केले जबरदस्त Prepaid Plans, ग्राहकांना मोफत मिळणार Disney+ Hotstar आणि बरंच काही…Vi साठी हे चांगलं नव्हतं, यामुळे बाजारातून पैसे उभे राहाणं आणखीन कठीण होत चाललं आहे. ग्राहकांना कितीही त्रास सहन करावा लागत असला तरी 99 रुपये आणि 128 रुपयांच्या प्लॅनची वैधता कमी केल्याने Vi ला खूप मदत होणार आहे. Vi चे रिचार्ज खूप महाग आहेत. त्यामुळे छोटे प्लॅन घेण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. 99 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करणार्या प्रत्येकाला आता अधिक वेळा रिचार्ज करावे लागेल. 99 रुपये आणि 128 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता कशी असणार ते समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बदल फक्त मुंबईतील टेलिकॉम सर्कलमध्ये लागू करण्यात आले आहेत.
Jio, Airtel आणि Vi च्या खास ऑफर्स, एकाच रिचार्जवर मिळणार डबल बेनिफिट99 रुपयांच्या प्लॅनची वैधता आता 28 दिवसांवरुन कमी करण्यात आली असून ती 15 दिवस करण्यात आली आहे. प्लॅनची एक दिवसाची किंमत 3.53 रुपये होती आता ती वाढवून 6.6 करण्यात आली आहे. या प्लॅनची बेनिफिट्स पहिल्यासारखेच राहातील फक्त वैधता कमी करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना 200 MB डेटा, 99 रुपयांचा टॉकटाइम आणि SMS ची सुविधा देण्यात आली आहे. Vodafone Idea 128 मुंबईतील 128 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांवरून 18 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. म्हणजेच या प्लॅनची एका दिवसाची किंमत 4.57 रुपयांवरून 7.11 रुपये झाली आहे. वापरकर्त्यांना 10 लोकल ऑन-नेट नाईट मिनिटे + सर्व स्थानिक/राष्ट्रीय कॉल 2.5p/sec वर मिळतात. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत रात्रीच्या मिनिटांचा लाभ मिळणार आहे.