मुंबई, 4 जून : प्रॉपर्टीजच्या वाढलेल्या किमतींमुळे (Property Prices) अनेकांना इच्छा असूनही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक (Real Estate Investment) करता येत नाही. तुम्हाला प्लॉट, फ्लॅट किंवा व्यावसायिक मालमत्ता घ्यायची असेल, तर त्यासाठी मोठी रक्कम लागते. रिअल इस्टेटमध्ये विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुम्हाला अनेक पटींनी परतावा देऊ शकते. त्यामुळेच तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगत आहोत. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (Real Estate Investment Trust) द्वारे तुम्ही चांगली कमाई करु शकता. REIT म्हणजे काय? म्युच्युअल फंड (Mutual Funds) अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून स्टॉक किंवा बाँडमध्ये गुंतवणूक करते, त्याचप्रमाणे REITs गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. यामुळे REIT ला नियमित उत्पन्न मिळते. तसेच, त्याने गुंतवलेल्या मालमत्तेचे मूल्य वाढतच जाते. त्याचाही फायदा त्याला होतो. REIT व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करते. हे मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बिझनेस पार्क इत्यादी असू शकते. या गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला भाड्याच्या स्वरूपात नियमित उत्पन्न मिळते. Investment Tips: FD चे केवळ फायदे नाही तोटे देखील आहेत; समजून घ्या मग गुंतवणूक करा REIT SEBI अंतर्गत येते SEBI ने 2015 मध्ये REIT साठी नियम तयार केले होते. REIT मध्ये गुंतवणुकीसाठी अटी व शर्ती घातल्या आहेत. REIT ला त्यांच्या निधीपैकी 80 टक्के निधी पूर्णपणे बांधलेल्या आणि भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवावा लागतो. नियमित उत्पन्न मिळवणे हा त्याचा उद्देश आहे. SEBI वेळोवेळी REIT शी संबंधित नियमांमध्ये आवश्यक बदल करते. SEBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, REITs ला त्यांच्या उत्पन्नाच्या 90 टक्के गुंतवणूकदारांमध्ये वितरित करावे लागतात. ही रक्कम गुंतवणूकदारांना लाभांश किंवा व्याजाच्या स्वरूपात वितरित केली जाते. हे गुंतवणूकदाराला त्याच्या REITs मधील गुंतवणुकीवर नियमित उत्पन्न मिळविण्याची संधी देते. REITs मध्ये काही लाख गुंतवण्याची गरज नसल्यामुळे, सामान्य गुंतवणूकदारही त्याद्वारे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकतो. सामान्यतः, REITs अशा मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतात ज्यामध्ये नियमित उत्पन्न मिळवण्याची क्षमता असते. गुंतवणुकीचा निर्णय तज्ञ घेतात. महागाईचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता; RBI ‘हे’ पाऊल उचल्यास तुमच्यावर काय परिणाम होणार? किमान गुंतवणूक किती आहे? सुरुवातीला, REITs मध्ये किमान गुंतवणूक रक्कम 2 लाख रुपये होती. नंतर SEBI ने ते 50,000 रुपये कमी केले. अलीकडे ती आणखी कमी करून 10,000-15,000 रुपये करण्यात आली आहे. अधिकाधिक गुंतवणूकदारांना REIT मध्ये गुंतवणूक करण्याची संधी देण्यासाठी SEBI ने हा बदल केला आहे. सध्या, देशातील स्टॉक एक्स्चेंजवर दोन REIT सूचीबद्ध आहेत.