JOIN US
मराठी बातम्या / मनी / RBI ची 'या' बँकेवर मोठी कारवाई; ग्राहकांना बँकेतून फक्त 15000 रुपये काढता येणार, तुमचंही खातं आहे का?

RBI ची 'या' बँकेवर मोठी कारवाई; ग्राहकांना बँकेतून फक्त 15000 रुपये काढता येणार, तुमचंही खातं आहे का?

रायगड सहकारी बँकांवरील हे निर्बंध पुढील सहा महिने लागू राहतील, असं रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या पुढील आदेशावरून स्थिती स्पष्ट होईल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जुलै : भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लादले आहेत. सहकारी बँकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. या निर्बंधांच्या अंमलबजावणीनंतर रायगड सहकारी बँकेच्या खातेदारांना 15 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. याशिवाय रिझर्व्ह बँकेने आणखी काही निर्बंध लादण्याची माहिती दिली आहे. रायगड सहकारी बँकेवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने एका अधिसूचनेत ही माहिती दिली की, रायगड सहकारी बँकेला पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देण्यासही मनाई केली आहे. त्याचप्रमाणे रायगड सहकारी बँक कोठेही गुंतवणूक करू शकत नाही किंवा ग्राहकांकडून नवीन ठेवी स्वीकारू शकत नाही. रायगड सहकारी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत आणि चालू खात्यातून 15,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. बँकिंग परवाना रद्द नाही रायगड सहकारी बँकांवरील हे निर्बंध पुढील सहा महिने लागू राहतील, असं रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या पुढील आदेशावरून स्थिती स्पष्ट होईल. रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लादण्याची घोषणा करणे म्हणजे बँकिंग परवाना रद्द झाला असा त्याचा अर्थ नाही, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सहकारी बँकेच्या ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मात्र, सहा महिन्यांनंतर त्यांच्या अडचणी दूर होऊ शकतात, ही दिलासादायक बाब आहे. आरबीआयने या बँकेवर दंड ठोठावला देशातील सर्व बँका आणि वित्तीय संस्थांवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवते. काही विसंगती आढळल्यास, रिझर्व्ह बँक अशी पावले उचलते. सेंट्रल बँकेने सांगितले की, रायगड सहकारी बँकेची आर्थिक स्थिती जसजशी सुधारेल तसतसे निर्बंध शिथिल होतील. सेंट्रल बँकेने एका वेगळ्या निवेदनात म्हटले आहे की, श्री छत्रपती राजर्षी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 6 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकिंग फसवणूक वर्गीकरण आणि अहवाल देण्यास होत असलेल्या विलंबामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या