Rajkumar Rao
मुंबई, 2 एप्रिल : आर्थिक फसवणुकीची (Financial Fraud) अनेक प्रकरणे आजवर समोर आली आहेत. त्यात गुन्हेगार वेगवेगळ्या आयडिया वापरुन लोकांची फसवणूक करत असतात. अनेकांना या ठगांमुळे मोठा फटका बसतो. मात्र बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) देखील आर्थिक फसवणुकीचा बळी ठरला आहे. पॅन कार्डच्या (PAN Card) माध्यमातून आपली फसवणूक झाल्याची माहिती राजकुमार रावने दिली आहे. राजकुमार राव यांनी सांगितले की, त्यांच्या पॅन कार्डशी संबंधित माहितीचा वापर करून अज्ञात व्यक्तीने त्याच्या नावावर कर्ज घेतले आहे. या फसवणुकीमुळे आपला क्रेडिट स्कोअर (Credit Score) खराब झाला आहे. याबात क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL) च्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले असल्याची माहिती राजकुमार रावने दिली आहे. नॅशनल अॅवॉर्ड विनर राजकुमार राव यांने शनिवारी एका ट्वीटमध्ये म्हटले की, #FraudAlert माझ्या पॅन कार्डचा गैरवापर झाला आहे आणि कुणीतरी माझ्या नावावर 2500 रुपयांचे छोटे कर्ज घेतले आहे. माझे CIBIL ला स्कोअरवर परिणाम झाला आहे. CIBIL ला आवाहन आहे की याविरुद्ध योग्य ती पावले उचलावीत.
PAN-Aadhaar Link: पॅन-आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता कोणत्या महिन्यात किती दंड भरावा लागणार? सनी लिओनीचीही फसवणूक याआधी फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री सनी लिओनीनेही पॅन लोन फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. सनी लिओनीने सांगितले होते की तिच्या पॅन नंबरवर कोणीतरी तिच्या नकळत 2,000 रुपये कर्ज घेतले आहे आणि त्यामुळे तिचा CIBIL स्कोर खराब झाला आहे. Aadhaar Card शी लिंक असलेला मोबाईल नंबर आठवत नाही? पटकन चेक करा डिटेल्स गेल्या काही काळापासून अशा तक्रारींमध्ये वाढ दुसऱ्या व्यक्तीच्या पॅनवर कर्ज घेतल्याच्या तक्रारी गेल्या काही काळापासून सातत्याने वाढत आहेत. या घोटाळ्याला बळी पडलेल्या अनेकांना आता एजंटांचे फोन येत आहेत, तर काही लोकांच्या नावे कारणे दाखवा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. अलीकडेच पत्रकार आदित्य कालरा यांनी 13 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर सांगितले की, धनी अॅपवरून त्यांच्या नावावर कर्ज घेण्यात आले आहे, ज्यासाठी त्यांनी अर्ज केला नव्हता.