रेल्वे तिकीट
ट्रेनमध्ये प्रवास करताना ट्रेनसंबंधी विविध प्रश्न काही प्रवाश्यांच्या मनात येत असतात. जसं की, पहिली ट्रेन कधी सुरू झाली? ट्रेनची लांबी किती आहे? ट्रेनमध्ये एसी डबे कधी बसवले गेले? ट्रेनच्या डब्यांचे रंग वेगळे का आहेत? तुम्हालाही अशा प्रश्नांचा उत्तरांबाबत जाणून घेण्यास आवडत असेलच. आज आम्ही तुम्हाला भारतामध्ये सर्वात प्रथम एसी कोच असलेली ट्रेन केव्हा सुरू झाली, याबाबत माहिती देणार आहोत. तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्य वाटेल की, भारतातील पहिली एसी ट्रेन ब्रिटिश काळातील आहे. विशेष म्हणजे आजही ही ट्रेन सुरू आहे. ‘फ्रंटियर मेल’ नावानं त्याकाळी ओळखल्या जाणाऱ्या या ट्रेनचं नाव बदलून आता ‘गोल्डन टेंपल मेल’ असं करण्यात आलं आहे. या ट्रेनला त्या काळातील सर्वात आलिशान ट्रेन म्हटलं जायचं, व ही ट्रेन वेळेत धावत होती. एकदा ही ट्रेन 15 मिनिटं उशिरानं धावली, त्यामुळे तिची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा विविध बाबी या ट्रेनबद्दल आपण जाणून घेऊयात.
भारतातील पहिली एसी ट्रेन 1 सप्टेंबर 1928 रोजी सुरू झाली. तेव्हा तिचं नाव ‘पंजाब मेल’ होतं. पण 1934 मध्ये या ट्रेनला एसी डबे जोडण्यात आले, आणि तिचं नाव ‘फ्रंटियर मेल’ असं ठेवण्यात आलं. मुंबई सेंट्रलहून अमृतसरला जाणारी ही ट्रेन देशाची फाळणी होईपर्यंत पाकिस्तानातल्या लाहोर आणि अफगाणिस्तान मार्गे मुंबई सेंट्रलला येत होती. ही ट्रेन त्यावेळी देशातील सर्वांत वेगवान धावणारी ट्रेन मानली जात होती. 1996 मध्ये या ट्रेनला ‘गोल्डन टेंपल मेल’ असं नाव देण्यात आलं.
ट्रेनमध्ये नसतं स्टेयरिंग, मग ट्रेन रुळ कसे बदलते? पाहा व्हिडिओही ट्रेन ब्रिटिशकालीन असून ती भारताच्या स्वातंत्र्याची साक्षीदार आहे. ही ट्रेन आजही सुरू आहे. पण आता ती ‘गोल्डन टेंपल मेल’ म्हणून ओळखली जाते. ‘फ्रंटियर मेल’ ही भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या लांब पल्ल्याच्या गाड्यांपैकी एक मानली जात होती. त्यावेळी एखाद्याला पत्र पाठवायचं असेल, तर तो या ट्रेनच्या गार्डद्वारे पाठवत असे. ‘फ्रंटियर मेल’च्या एसी डब्यात प्रवास करणारे बहुतेक प्रवासी ब्रिटिश होते.
ट्रेन इंजिनच्या खाली असतो रेतीने भरलेला डब्बा, कारण जाणून व्हाल चकीत!असा ठेवला जात होता ट्रेनचा डबा थंड ‘फ्रंटियर मेल’ ट्रेनमध्ये एसी डबे जोडण्यात आले, तेव्हा ते थंड करण्यासाठी बोगीखाली बर्फाच्या लाद्या ठेवण्यात येत होत्या. यानंतर पंख्यांचा वापर करून प्रवाशांसाठी थंडावा निर्माण केला जात होता. प्रवासादरम्यान एसी डबा थंड राहावा, यासाठी वाटेत वेगवेगळ्या स्थानकांवर लादी वितळून तयार झालेले पाणी टाकून दिलं जातं होतं, व पुन्हा त्यात बर्फाच्या लाद्या भरल्या जात