JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / 1 डिसेंबरपासून PNB करणार मोठा बदल, ग्राहकांच्या खिशावर होणार थेट परिणाम

1 डिसेंबरपासून PNB करणार मोठा बदल, ग्राहकांच्या खिशावर होणार थेट परिणाम

तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल (Alert for PNB customers) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. यामुळे ग्राहकांची बचत कमी होणार आहे. बँक तुमच्या बचत खात्यावरील व्याजदरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेत आहे.

0107

तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल (Alert for PNB customers) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. यामुळे ग्राहकांची बचत कमी होणार आहे. बँक तुमच्या बचत खात्यावरील व्याजदरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेत आहे.

जाहिरात
0207

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank Saving Account Interest Rate) 1 डिसेंबर 2021 पासून बचत खात्यावरील व्याजदर कमी करणार आहे.

जाहिरात
0307

किती असणार व्याज- बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, बचत खात्यावर (PNB Saving Account Interest Rate Update) मिळणारे वार्षिक व्याज 2.90 टक्क्यांवरुन 2.80 टक्के करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या या निर्णयामुळे जुन्या आणि नवीन दोन्ही ग्राहकांवर परिणाम होणार आहे. शिवाय एनआरआय ग्राहकांवर देखील याचा परिणाम होणार आहे. याआधी पंजाब नॅशनल बँकेने 1 सप्टेंबर रोजी बचत खात्यावरील व्याजदरात कपात करत ते 2.90 टक्के केले होते.

जाहिरात
0407

किती बॅलन्सवर किती मिळेल व्याज- पंजाब नॅशनल बँकेच्या मते, 1 डिसेंबर 2021 पासून बचत खात्यात 10 रुपयांपेक्षा कमी ठेव तुमच्या बचत खात्यात असेल तर तर त्यावर वार्षिक 2.80 टक्के दराने व्याज मिळेल. तर त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास व्याजदर 2.85 टक्के असणार आहे.

जाहिरात
0507

PNB देशातील दुसरी मोठी सरकारी बँक आहे. याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बचत खात्यावर 2.70 टक्के दराने वार्षिक व्याजदर देऊ करते. एसबीआय एक लाख रुपयांपर्यंतचा डिपॉझिटवर 2.70 टक्के दराने व्याज देते. तर Kotak Mahindra Bank आणि इंडसइंड बँकेच्या बचक खात्यावर वार्षिक 4-6% व्याजदर आहे.

जाहिरात
0607

सरकारी बँकांमध्ये बचत खात्यावरील व्याजदर- 1) आयडीबीआय बँक – 3 ते 3.25 टक्के 2) कॅनरा बँक – 2.90 ते 3.20 टक्के 3) बँक ऑफ बडोदा – 2.75 ते 3.20 टक्के 4) पंजाब अँड सिंध बँक – 3.10 टक्के

जाहिरात
0707

बचत खात्यावर खाजगी बँकांमध्ये मिळेल जास्त व्याजदर- 1) एचडीएफसी बँक – 3 ते 3.5 टक्के 2) आयसीआयसीआई बँक – 3 ते 3.5 टक्के 3) कोटक महिंद्रा बँक – 3.5 टक्के 4) इंडसइंड बँक – 4 ते 5 टक्के

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या