JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / PNB ग्राहक असाल तर लक्ष द्या! पुढील महिन्यापासून या ATM मधून काढता येणार नाहीत पैसे

PNB ग्राहक असाल तर लक्ष द्या! पुढील महिन्यापासून या ATM मधून काढता येणार नाहीत पैसे

तुमचे देखील पंजाब नॅशनल बँकेमध्ये (Punjab National Bank) खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील महिन्याच्या एक तारखेपासून PBB च्या ग्राहकांन नॉन-ईएमव्ही एटीएम मशीन्समधून पैसे काढता येणार नाहीत.

0105

देशामध्ये वाढलेल्या बँकिंग फसवणुकीला रोखण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने मोठं पाऊल उचललं आहे. तुमचे देखील पंजाब नॅशनल बँकेमध्ये खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

जाहिरात
0205

1 फेब्रुवारीपासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमव्ही एटीएम एटीएम मशीन्समधून (Non-EMV ATM) ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीत. अर्थात या नॉन-ईएमव्ही मशीन्समधून कॅश काढू शकत नाहीत. PNB ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.

जाहिरात
0305

पंजाब नॅशनल बँकेने ट्वीट करून अशी माहिती दिली आहे की, फसवणुकीपासून वाचण्यासाठी ग्राहकांना पीएनबी नॉन ईएमव्ही एटीएम मशीन्समधून 01.02.2021 पासून व्यवहार (वित्तिय किंवा गैर-वित्तिय) करण्यापासून प्रतिबंधत केलं जाईल. गो डिजिटल.. गो सेफ!

जाहिरात
0405

Non-EMV ATM म्हणजे काय?- नॉन ईएमव्ही एटीएम म्हणजे ज्यामध्ये व्यवहारावेळी कार्ड ठेवले जात नाही. यामध्ये मॅग्नेटिक स्ट्रीपच्या माध्यमातून डेटा रीड केला जातो. ईएमव्ही एटीएम मशिन्समध्ये कार्ड काही काही सेकंड्ससाठी लॉक होतं.

जाहिरात
0505

अलीकडेच दिली आहे ही सुविधा अलीकडेच पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या ग्राहकांना PNBOne अॅपच्या माध्यमातून एटीएम डेबिट कार्डला ऑन-ऑफ करण्याची सुविधा दिली आहे. तुम्ही कार्ड वापरत नसाल तर 'ऑफ' करू शकतात. अशावेळी तुमचे बँक खाते सुरक्षित राहू शकते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या