मुंबई, 17 जून : आपण जेव्हा बँकेत आपलं खातं सुरू करतो तेव्हा एक डेबिट कार्ड मिळतं. पण एक सरकारी बँक खातं सुरू केलं तर तीन डेबिट कार्ड्स देतंय. देशातली मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक ( PNB )नं ग्राहकांसाठी मोठी सुविधा आणलीय. बँकेनं आपल्या खातेधारकांना तीन डेबिट कार्डस् देण्याची घोषणा केलीय. PNBनं सांगितलं की याचा उपयोग कुटुंबातले इतरही करू शकतात. एका खात्याशी लिंक होतील तीन डेबिट कार्डस् बँकेनं ट्वीट करून सांगितलंय की ज्या ग्राहकांना ही सुविधा हवीय, त्यांनी बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा. खातेधारकाच्या कुटुंबातले सदस्य- आई,वडील, पत्नी आणि मुलं - ही कार्ड्स वापरू शकतात. ही कार्डस् PNB च्या ATMसाठी वापरता येतील. तुम्ही दुसऱ्या बँकेच्या ATMमध्ये फक्त प्रायमरी कार्ड वापरू शकता. ग्राहकांना जी जादा कार्डस् मिळतील त्यावर प्रायमरी कार्डबद्दल माहिती असेल. SBI नं ग्राहकांना दिल्या पैसे सुरक्षित ठेवण्याच्या ‘या’ टिप्स
यांना मिळेल सुविधा ही सुविधा अशा ग्राहकांना मिळेल जे आपला केवायसी अपडेट ठेवतात. शिवाय खात्यात कमीत कमी बँलन्स ठेवतात. आपल्या खात्यातून पैशाची देवाणघेवाण करतात. नवे ग्राहक ही सुविधा PNBमध्ये बचत खातं उघडण्याच्या वेळी घेऊ शकतात. पर्सनल डेबिट कार्डासाठी तुम्ही बँकेच्या शाखेत अर्ज देऊ शकता. त्यात ग्राहकाला मास्टरकार्ड दिलं जाईल. स्वीस बँकेत कुणाचे पैसे ? स्वित्झर्लंडनं जाहीर केली 50 भारतीयांची नावं भारत-पाकिस्तान मॅचवर लागला होता तब्बल 800 कोटींचा सट्टा, एकाला अटक 1 लाखापर्यंत करू शकता फंड ट्रान्सफर हे कार्डधारक आपल्या खात्यातून रोज PNBच्या ATMमधून 1 लाख रुपयांचा फंड ट्रान्सफर करू शकतात. नाव आणि फोटोशिवायचं डेबिट कार्ड बँकेच्या शाखेत लगेच दिलं जातं. आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी अनेक बँका वेगवेगळ्या योजना आणतायत. VIDEO: रोहितच्या त्या शतकी खेळीवर प्रशिक्षक झाले फिदा