JOIN US
मराठी बातम्या / मनी / PPF की SSY मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी कोणती योजना फायदेशीर? नीट समजून घ्या

PPF की SSY मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी कोणती योजना फायदेशीर? नीट समजून घ्या

दोन्ही योजना उत्तम आहेत मात्र दोघांपैकी कोणती योजना चांगली आहे, याचा निर्णय घेणे पालक म्हणून अनेकदा कठीण होतं. त्यामुळे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) मधील फरक समजून घेऊयात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मे : मुलीच्या भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय निवडण्यासाठी पालक प्रयत्नशील असतात. मुलींचं शिक्षण आणि लग्नाचा खर्च याच्या नियोजनासाठी सरकार अनेक योजना आणत आहे. अशाच दोन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हीही चांगला परतावा मिळवू शकता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojna) या त्या दोन योजना आहेत. या दोन्ही योजना उत्तम आहेत मात्र दोघांपैकी कोणती योजना चांगली आहे, याचा निर्णय घेणे पालक म्हणून अनेकदा कठीण होतं. त्यामुळे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) मधील फरक समजून घेऊयात. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेचा लॉक इन कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेत गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळते. तसेच एका आर्थिक वर्षात, तुम्हाला किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवण्याची संधी मिळेल. यात सुमारे 7.1 टक्के वार्षिक व्याज दर मिळतो. तुम्हाला अचानक पैशांची गरज भासल्यास, तुम्ही 5 वर्षांनंतर एकूण ठेवीपैकी 50 टक्के रक्कम देखील काढू शकता. तुम्ही मुलगा आणि मुलगी दोघांसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकता. रिझर्व्ह बँकेचा क्रेडिट-डेबिट कार्ड ग्राहकांना मोठा दिलासा; बँकांची मनमानी रोखण्यासाठी नवी नियमावली सुकन्या समृद्धी योजना (SSY) मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला वार्षिक 7.6 टक्के व्याजदर मिळतो. या योजनेत, तुम्हाला एका वर्षाच्या आत किमान 250 रुपये जमा करणे बंधनकारक आहे. त्याच वेळी, या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत 0 ते 10 वर्षे वयोगटातील मुलीचे खाते उघडता येते. LIC IPO साठी खास मोठा निर्णय; ‘या’ दिवशीही गुंतवणूकदारांना लावता येणार बोली मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर, तिच्या शैक्षणिक खर्चासाठी खात्यातून आंशिक पैसे काढू शकता. मुलगी 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती खात्यातून संपूर्ण पैसे काढू शकते. या योजनेत, मुलगी 15 वर्षांची होईपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि ठेव रकमेवरील व्याज तुम्हाला सरकार 21 वर्षांसाठी देईल. तुम्हाला दोनपैकी कोणत्याही एका योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये जास्त परतावा मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या