JOIN US
मराठी बातम्या / मनी / PPF, सुकन्या, NSC मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी बातमी, सरकारच्या या निर्णयाचा होणार परिणाम

PPF, सुकन्या, NSC मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी बातमी, सरकारच्या या निर्णयाचा होणार परिणाम

पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर जास्त फायदा मिळवायचा असेल तर तुमच्याकडे फक्त एक दिवस आहे. मोदी सरकार नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स (NFC), पब्लिक प्रॉव्हिंडट फंड (PPF), किसान विकास पत्र (KVP) यासह छोट्या बचत योजनांवरचे व्याजदर घटवू शकतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर जास्त फायदा मिळवायचा असेल तर तुमच्याकडे फक्त एक दिवस आहे. मोदी सरकार नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स (NFC), पब्लिक प्रॉव्हिंडट फंड (PPF), किसान विकास पत्र (KVP) यासह छोट्या बचत योजनांवरचे व्याजदर घटवू शकतं. अशा छोट्या बचत योजनांवर सरकार तिमाही व्याजदर निश्चित करतं. सरकारने ऑक्टोबर डिसेंबर या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार सरकार जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांची घोषणा करेल. आणखी काही बचत योजना बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस जादा व्याजदर असलेल्या योजना जाहीर करतं आहे. व्यावसायिक बँका एफडीवर 6.25 ते 6.50 टक्के दरवर्षी व्याजदर देतात. त्याच वेळी पोस्ट ऑफिसच्या योजनांवर सुमारे 7.5 टक्के व्याज मिळतं. 1 एप्रिल 2016 पासून सरकार छोट्या बचत योजनांचा व्याजदर तिमाहीवर ठरवते. छोट्या बचत योजनांवरचे सध्याचे व्याजदर 1. पब्लिक प्रोविडेंट फंड (Public Provident Fund (PPF interest Rate): 7.9% सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Scheme Interest Rate): 8.4% **2.**वरिष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme Interest Rate): 8.6% 3. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट(National Savings Certificate (NSC) Interest Rate): 7.9% 4. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra (KVP) Interest Rate): 7.6% 5. नॅशनल सेव्हिंग्ज मंथली इनकम अकाउंट (Monthly Income Scheme Account, MIS Interest Rate): 7.6% 6. नॅशनल सेव्हिंग्ज रिकरिंग डिपॉझिट अकाउंट (National Savings Recurring Deposit Account Interest Rate): 7.2% ========================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या