नवी दिल्ली, 31 मार्च : केंद्र सरकारने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मोठा धक्का दिला आहे. 1 एप्रिलपासून पीपीएफसह (PPF) सगळ्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये (Interest rates on Investment) मोठी कपात करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सेव्हिंग डिपॉझिटवर 3.5 टक्के, एका वर्षाच्या डिपॉझिटवर 4.4 टक्के, 2 वर्षांच्या डिपॉझिटवर 5 टक्के आणि 5 वर्षांच्या डिपॉझिटवर 5.8 टक्के व्याज देण्यात येईल, तसंच पीपीएफवर 6.4 टक्के व्याज मिळेल. सगळ्या ठेवींवरील व्याजदरात सरासरी एक टक्का घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये 7.4 टक्क्यांच्या ऐवजी 6.5 टक्के, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 6.8 टक्क्यांच्याऐवजी 5.9 टक्के किसान विकास पत्रावर 6.9 टक्क्यांऐवजी 6.2 टक्के आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्क्यांऐवजी 6.9 टक्के व्याज देण्यात येणार आहे.
1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या तिमाहीसाठीचे हे दर असतील. कोरोनाच्या संकटामुळे देशातली अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे सरकारच्या उत्पन्नाचा स्त्रोतही आटला आहे, त्यामुळे व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.