पीपीएफ खातं कसं सुरु करावं
नवी दिल्ली, 22 मार्च: सध्याच्या काळात गुंतवणुकीवर लोकांचा भर आहे. महागाईच्या काळात पीपीएफ हा सुरक्षित आणि सोयीस्कर गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामुळे अनेक जण गुंतवणुकीसाठी हा पर्याय अवलंबत असतात. जर तुम्ही देखील PPF मध्ये गुंतवणूक केली असेल आणि तुमचे खाते काही कारणास्तव बंद झाले असेल किंवा निष्क्रिय झाले असेल तर टेंशन घेऊ नका. कारण तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्ही तुमचे खाते पुन्हा सुरू करू शकता. कारण कोणतीही व्यक्ती फक्त एकच PPF खाते उघडू शकते. टॅक्स सूटच्या दृष्टीने देखील पीपीएफमध्ये गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. कारण यामध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्स सूटचा लाभ मिळतो. याशिवाय मॅच्युरिटी रक्कम आणि व्याजाचे उत्पन्नही करमुक्त आहे. चला तर मग आज आपण पीपीएफ खातं बंद पडलं असेल तर कसं सुरु करायचंय हे पाहणार आहोत.
जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन पीपीएफ खाते उघडता येते. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये, तुम्हाला एका वर्षात किमान 500 रुपये गुंतवावे लागतील आणि जर तुम्ही किमान गुंतवणुकीची अट पूर्ण केली नाही तर तुमचे पीपीएफ खाते निष्क्रिय होईल.
सहकारी बँका FD वर देताय 9 टक्के व्याज, पण धोके माहितीये का?पीपीएफ खातेधारकाने एखाद्या आर्थिक वर्षात खात्यात किमान रक्कम टाकली नाही किंवा ती ठेवायला विसरला तर हे खाते बंद होते. PPF मध्ये, 15 वर्षांनी मॅच्युरिटी कालावधी संपल्यानंतरच, ग्राहकाला त्याची रक्कम व्याजासह मिळते. हे व्याज दरवर्षी बॅलेन्स रकमेत जोडले जाते. हे बंद पीपीएफ खात्यावरही लागू आहे. सरकार वेळोवेळी व्याजदर निश्चित करत असते. मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी बंद केलेले पीपीएफ खाते कायमचे बंद केले जाऊ शकत नाही. जर एखाद्याला ते सक्रिय करायचे असेल, तर हे काम मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी कधीही केले जाऊ शकते. पीपीएफ पासबुकमध्ये मॅच्युरिटीची तारीख नमूद केलेली असते.
बंद केलेले पीपीएफ खाते अॅक्टिव्ह करण्यासाठी, तुम्हाला ते जिथे उघडले होते त्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक लेखी अर्ज द्यावा लागेल. मॅच्युरिटी कालावधी दरम्यान बंद केलेले पीपीएफ खाते पुन्हा सुरू केले जाऊ शकते. यासाठी 500 रुपयांसोबत वार्षिक 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क वार्षिक आधारावर द्यावं लागेल.