पोस्ट ऑफिस (Post Office) ने बचत खात्यासंदर्भातील काही नियमात बदल केले आहेत. जर ग्राहकांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्या खात्यातून पैसे कापले जाऊ शकतात
पोस्ट ऑफिस (Post Office) नेहमी त्यांच्या ग्राहकांसाठी विविध योजना घेऊन येते. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांवर ग्राहकांना सुरक्षित आणि गॅरंटीड रिटर्न देखील मिळतो.
मात्र पोस्ट ऑफिसने आता बचत खात्यासंदर्भातील काही नियमात बदल केले आहेत. जर ग्राहकांनी या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्या खात्यातून पैसे कापले जाऊ शकतात
पोस्टाने बचत खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक रक्कम (Minimum Balance) ठेवण्याची मर्यादा 50 रुपयांवरून 500 रुपये केली आहे. जर तुमच्या खात्यामध्ये 500 पेक्षा कमी रक्कम असेल तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पोस्ट ऑफिसकडून 100 रुपये वसूल केले जातील. दरवर्षी असे करण्यात येईल
जर तुमच्या खात्यामध्ये झिरो बॅलेन्स असेल तर तुमचे खाते बंद केले जाईल. सध्या पोस्टात व्यक्तिगत/संयुक्त खात्यांवर दरवर्षी 4 टक्के व्याज देते.
त्याशिवाय अद्याप तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक केले नसेल तर लवकरच हे काम पूर्ण करा. कारण त्यानंतरच तुम्ही सरकारी सबसिडीचा लाभ घेऊ शकता
पोस्टात बचत खाते उघडल्यानंतर काही सुविधा मिळतात. विना-चेक सुविधेच्या खात्यात किमान शिल्लक 50 रुपये असणे आवश्यक आहे. प्रति वर्ष 10000 रुपयांपर्यंत मिळणारे व्याज 2012-13 या आर्थिक वर्षापासून करमुक्त आहे.
त्याशिवाय अल्पवयीन व्यक्तीच्या नावेही खाते उघडले जाऊ शकते. दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या अल्पवयीन व्यक्ती देखील खाते उघडू आणि ऑपरेट करू शकतात.
शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस सेव्हिंग खाते आधारशी जोडावे लागेल. डाक विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे. टपाल खात्याने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की लोक त्यांच्या पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) घेऊ शकतात. त्याचप्रमाणे आधार लिंक करण्याचा कॉलम देखील आहे. हा कॉलम खाते उघडण्याच्या अर्जात किंवा पर्चेस ऑफ सर्टिफिकेट फॉर्म दिसून येईल.