JOIN US
मराठी बातम्या / मनी / PM Kisan चा 14 वा हप्ता येणार, या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार; यात तुम्हीही आहात का?

PM Kisan चा 14 वा हप्ता येणार, या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार; यात तुम्हीही आहात का?

PM Kisan 14th Installment update: पीएम किसानच्या 14व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच एक चांगली बातमी येणार आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारने 2000 रुपयांचा हप्ता जाहीर करण्याची पूर्ण तयारी केली आहे.

जाहिरात

पीएम किसान योजना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 एप्रिल : सरकारने पीएम किसान सन्मान निधीचे 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले आहेत. यानंतर आता सर्व लाभार्थी 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा हप्ता मे किंवा जून महिन्यात जारी केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारनेही पूर्ण तयारी केली आहे. मात्र, याबाबत अजुनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा 2000 रुपयांचे तीन हप्ते मिळतात. एकूणच, सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वार्षिक 6000 रुपये थेट जमा करते.

सरकारने छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू केली होती. पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. आतापर्यंत 13 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आलेय.

या शेतकऱ्यांना मिळू शकतात 4000 रुपये

ज्या शेतकऱ्यांना अद्याप 13व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील. म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील. अनेक शेतकरी व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना 13व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. मात्र, आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्यांचे व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता 2000 ऐवजी 4000 रुपये मिळणार आहेत.

मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन येतंय? लगेच खरेदी करा LIC ची पॉलिसी, चिंता होईल दूर

चेक करा तुमचं स्टेटस

शेतकरी आता पीएम किसानच्या वेबसाइटवर 14 व्या हप्त्यासाठी त्यांचे स्टेटस चेक करु शकतात. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील की नाही हे त्यांना पाहता येईल. स्टेटस चेक करण्यासाठी, तुम्हाला पीएम किसानच्या http://pmkisan.gov.in/ वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवरील फार्मर्स कॉर्नरवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटसचा पर्याय निवडा. या पेजवर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी कोणताही एक ऑप्शन निवडा. या तीन नंबरद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे येतील की नाही हे पाहू शकता.

सोनं एवढं महाग का असतं? कधी विचार केलाय का? हे आहे खास कारण

संबंधित बातम्या

बेनिफिशियरी स्टेटस काय?

बेनिफिशियरी स्टेटसमध्ये शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजना खात्याचे संपूर्ण डिटेल्स असतात. म्हणजेच शेतकऱ्यांच्या अकाउंटवर आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, त्याच्या बँक खात्यात पैसे कधी जमा झाले आहेत, त्याचे कोणतेही हप्ते अडकले आहेत तर त्याचे कारण काय आहे, त्यांचे आधार कार्ड व्हेरिफाय झाले आहे की नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या