JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / PM Jan-Dhan Account: खूशखबर! जनधन खातेधारकांना मिळेल 1.3 लाख रुपयांचा फायदा, वाचा सविस्तर

PM Jan-Dhan Account: खूशखबर! जनधन खातेधारकांना मिळेल 1.3 लाख रुपयांचा फायदा, वाचा सविस्तर

PM Jan-Dhan Account: पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत (PMJDY) खातेधारकांना 1.3 लाख रुपयांचा फायदा मिळतो. या योजनेमध्ये अपघात विमा देण्यात येतो.

019

तुम्ही देखील जनधन खातं (Jan Dhan Account) उघडण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून जनधन खातंधारकांना 1.30 लाख रुपयांचा फायदा मिळेल. तुम्हाला देखील हा फायदा मिळवायचा असेल तर आजच रजिस्ट्रेशन करा

जाहिरात
029

पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana- PMJDY) ग्राहकांना अनेक प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळत. जाणून घ्या कशाप्रकारे तुम्ही 1.30 लाखांचा फायदा मिळवू शकता

जाहिरात
039

01.30 लाख रुपयांचा लाभ- पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत ज्यांनी खातं उघडलं आहे त्यांना 1.30 लाखापर्यंत लाभ मिळतो. यामध्ये अपघाती विमा मिळतो. खातेधारकाला 1,00,000 रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचा जनरल विमा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर खातेदाराचा अपघात झाला तर 30,000 रुपये दिले जातात. या दुर्घटनेत खातेदाराचा मृत्यू झाल्यास एक लाख रुपये दिले जातात, म्हणजे एकूण 01.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.

जाहिरात
049

कुणाला उघडता येईल खातं?- 1. भारताचा कुणीही नागरिक या योजनेअंतर्गत खातं उघडू शकतो. 2. खातं उघडण्यासाठी 10 वर्षांची कमीतकमी वयोमर्यादा आहे.

जाहिरात
059

या योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा अधिक वय असणारा कोणताही पात्र भारतीय नागरिक कोणत्याही शाखेत जाऊन खातं उघडू शकतो. शिवाय तुम्ही बँक मित्राच्या मदतीने देखील खातं उघडू शकता.

जाहिरात
069

काय आहेत फायदे?- 1) खात्यात कमीतकमी शिल्लक (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची मर्यादा नाही. 2) सेव्हिंग अकाउंट इतकेच व्याज मिळेल 3) मोबाइल बँकिंगची मोफत सुविधा 4) 10 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा 5) PMJDY चे असे खातेधारक ज्यांनी रुपे कार्ड सुविधा घेतली आहे त्यांना 2 लाखापर्यंत अपघाती विमा कव्हर मिळतो.

जाहिरात
079

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब लोकांचे खाते झिरो बॅलेन्सवर बँक, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडले जाते.

जाहिरात
089

तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत जा. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल.

जाहिरात
099

तसेच PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाउंट उघडू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचं वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे ते जन धन खातं उघडू शकतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या