JOIN US
मराठी बातम्या / मनी / EPFO कर्मचाऱ्यांचे पैसे कुठेही जाणार नाहीत; सरकारकडून आश्वासन, नेमकं काय प्रकरण

EPFO कर्मचाऱ्यांचे पैसे कुठेही जाणार नाहीत; सरकारकडून आश्वासन, नेमकं काय प्रकरण

कर्मचाऱ्यांच्या खात्यावर व्याजदराची रक्कम जमा होण्यासाठी का होतोय उशीर, मंत्रालयाने दिलं उत्तर

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : कर्मचाऱ्यांच्या पगारातून EPFO कापला जातो. कंपनीकडून आणि कर्मचाऱ्याच्या बेसिक पगाराच्या 12 टक्के रक्कम EPFO ला जमा केली जाते. यावर सरकार इंटरेस्ट रेटचे पैसे खात्यावर जमा केले जातात. मात्र काही खातेधारकांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याचं समोर आलं. त्यामुळे अनेकांनी याबाबत ट्विट करून EPFO ला प्रश्न केला. मंत्रालयाने दिलेल्या उत्तरानं अनेक कर्मचारी आणि पगारदारांचा जीव भांड्यात पडला आहे. तुमच्या खात्यावरही पैसे जमा झाले की नाही ते देखील तुम्ही चेक करा. गेल्या काही वर्षांपासून, EPFO ​च्या विश्वस्त मंडळाने आर्थिक वर्षाच्या व्याजदरावर घेतलेला वेळ आणि सभासदांच्या खात्यात प्रत्यक्षात व्याज जमा होण्याची वेळ यांच्यात सातत्याने मोठं अंतर पडत असल्याचं दिसत आहे. ज्यावेळी आर्थिक वर्षातील व्याजदराबाबत महत्त्वाचा निर्णय होतो त्यानंतर एक निवेदन दिलं जातं. या निवेदनानंतर व्याजदर खातेधारकाच्या खात्यावर जमा होण्यासाठी साधारण 9 महिन्यांचा वेळ लागतो. EPFOकडून मार्च 2021 मध्ये 8.5 टक्के व्याज निश्चित केलं. EPFO ने ऑक्टोबर 2021 मध्ये एका निवेदनाद्वारे सदस्यांना माहिती दिली. व्याजदर डिसेंबर २०२१ मध्ये जमा करण्यात आलं.मार्च आणि डिसेंबरमधील अंतर जवळजवळ नऊ महिन्यांचं अंतर होतं. या वर्षाच्या सुरुवातीला, 2021-22 चे व्याज जुलै 2022 पर्यंत जमा करायचे होते, अजून सुमारे चार महिन्यांचं अंतर होतं.

संबंधित बातम्या

याबाबत आता फायनान्स मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याचं आर्थिक नुकसान होणार नाही. सर्व ईपीएफ खातेधारकांच्या खात्यात व्याज जमा केले जात आहे. सॉफ्टवेअर अपडेट होत असल्याने त्यामुळे पैसे पासबुकवर जमा होण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे तो दिसून येत नाही असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

जे कर्मचारी सर्व पैसे काढू इच्छितात त्यांना व्याजासह पैसे काढता येणार आहेत असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम असल्याने उशीर होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांच्या घामाचे पैसे कुठेही जाणार नाहीत असं आश्वासन देण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या