JOIN US
मराठी बातम्या / मनी / PF Account: अडचणीच्या काळात पीएफचे पैसे काढायचेत? घरबसल्या 3 दिवसांत मिळतील पैसे

PF Account: अडचणीच्या काळात पीएफचे पैसे काढायचेत? घरबसल्या 3 दिवसांत मिळतील पैसे

PF Account: कोविड महामारीच्या काळात पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला होता. सरकार लवकरच पीएफ खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम टाकू शकतं. पण तुम्ही बँक खात्याप्रमाणं पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट: खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी भविष्य निर्वाह निधी (PF Account) ही एक अतिशय महत्त्वाची बचत आहे. या निधीमध्ये जमा केलेल्या रकमेमुळं नोकरदारांना अडचणीच्या काळात मोठा दिलासा मिळतो. कोविड महामारी दरम्यान, नोकरदार लोकांसाठी FIF ची रक्कम खूप उपयुक्त ठरली. पगारदारांच्या पगाराचा काही भाग पीएफ फंडात जमा केला जातो. या फंडात जमा केलेल्या रकमेवर सरकार व्याज (PF Interest) देतं. सरकारनं या आर्थिक वर्षासाठी पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज निश्चित केलं आहे. घरबसल्या काढता येतात पैसे -  सरकार लवकरच पीएफ खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम टाकू शकतं. पण तुम्ही बँक खात्याप्रमाणं पीएफ खात्यातून पैसे काढू शकत नाही. EPFO काही अटींसह पीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देते. परंतु, तुम्ही घरी बसून पीएफचे पैसे सहज काढू शकता. ईपीएफओनुसार, तुम्ही केवळ 72 तासांत ऑनलाइन पैसे काढू शकता.  पैसे काढण्याचे नियम-  कोविड महामारीच्या काळात पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलण्यात आले होते. यापूर्वी, निवृत्तीनंतर किंवा घर खरेदी आणि मुलांचं शिक्षण यासारख्या गरजांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येत होते. कोरोना महामारीमुळे लोकांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या लक्षात घेता EPFO ​​नं विशेष सूट दिली आहे. अशा परिस्थितीत, कोणीही आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो, परंतु पैसे काढण्याची रक्कम देखील निश्चित करण्यात आली आहे.  हेही वाचा-  ‘या’ लोकांना मिळतं निळ्या रंगाचं Aadhaar Card, प्रक्रिया आहे खूपच सोपी किती दिवसात पैसे मिळतात?  कोणताही खातेदार तीन महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा PF खात्यातील एकूण जमा रकमेच्या 75 टक्के रक्कम सहज काढू शकतो. यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम काढता येते. ऑनलाइन क्लेम करणाऱ्यांना तीन दिवसांत हे पैसे बँक खात्यात जमा होतात. तर ऑफलाइन दावा करणाऱ्यांना 20 दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.   पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे कसे काढायचे?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या