JOIN US
मराठी बातम्या / मनी / सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री! घरगुती गॅससह 'या' वस्तूंच्या किमतींचा उडाला भडका

सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री! घरगुती गॅससह 'या' वस्तूंच्या किमतींचा उडाला भडका

Price Hike: मार्च महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात लोक पुढील आर्थिक वर्षाचे बजेट तयार करतात. दरम्यान, मार्चमध्ये दूध, पेट्रोल-डिझेल (Fuel price hike) ते एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 मार्च : मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी 31 मार्च हा केवळ कोणत्याही आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसतो, तर आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक कामं पूर्ण करण्याची अंतिम मुदतही असते. या महिन्यात सर्व जण आपले वर्षभराचे हिशेब पूर्ण करून पुढच्या वर्षातल्या आर्थिक गुंतवणुकीचा प्लॅन करत असतात. मात्र, इतर वर्षांच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात महागाई वाढत असून अनेकांचं शेवटच्या महिन्यातलं आर्थिक गणित फिस्कटलं आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे काही वस्तूंचे दर वाढले आहेत. याशिवाय या महिन्यात सामान्य माणसाच्या खिशावर अतिरिक्त भार टाकण्यास कोणत्या वस्तूंची दरवाढ कारणीभूत ठरली, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. दुधाच्या दरात वाढ मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अमूल (Amul), पराग (Parag) आणि नंतर मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाचे दर लिटरमागे दोन रुपयांनी वाढवले. मध्य प्रदेशातल्या सांची या कंपनीने दुधाच्या दरात लिटरमागे पाच रुपयांची वाढ केली आहे. दूध हा रोजच्या वापरातला अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. केवळ 13,650रुपयांत बना बाबा रामदेव यांचे बिजनेस पार्टनर,24 मार्चपासून मिळेल संधी पेट्रोल-डिझेल महागले गेले काही दिवस स्थिर असलेल्या पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या (diesel rate) दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी (22 मार्च) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ केली. या वाढीनंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96 रुपये 21 पैशांवर पोहोचली आहे. डिझेलचा दर 87.47 रुपये झाला आहे. गॅस महागला 22 मार्चपासून एलपीजी (LPG) सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. यामुळे मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये झाली आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर पहिल्यांदाच एलपीजी सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. Gold Price Today : सोने-चांदी दरात आज पुन्हा तेजी, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात वाढ तेल कंपन्यांनी अलीकडेच घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली आहे. रेल्वे, राज्य मार्ग परिवहन महामंडळं, बस ट्रान्सपोर्टर्स, मॉल्स आणि संरक्षण क्षेत्रातल्या आस्थापना यांचा घाऊक ग्राहकांमध्ये समावेश होतो. या दरवाढीमुळे येत्या काळात या सर्व घटकांशी संबंधित सेवा महागण्याची भीती आहे. मॅगी आणि कॉफीच्या किमती वाढल्या या महिन्यात नेस्लेने मॅगीच्या (Maggie) छोट्या पॅकची किंमत 12 रुपयांवरून 14 रुपये केली आहे. कंपनीने मॅगीच्या सर्व प्रकारच्या पॅकेट्सच्या किमतीत वाढ केली आहे. यासोबतच कंपनीने चहा, कॉफी (coffee) आणि दुधाच्या दरातही वाढ केली आहे. त्याचबरोबर हिंदुस्तान युनिलिव्हर या FMCG कंपनीनेही उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला दैनंदिन वापरात लागणाऱ्या उत्पादनांच्या किमती वाढल्याने अनेकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून येत्या काळात गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या