JOIN US
मराठी बातम्या / मनी / Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा मुंबईतील आजचा भाव

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा मुंबईतील आजचा भाव

एका आठवड्यापूर्वी दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 80 टक्क्यांची वाढ होत होती. आज शनिवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 एप्रिल : पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज होणाऱ्या 80 पैशांच्या वाढपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपासून किमतीत होणारी सततची वाढ थांबली आहे. एका आठवड्यापूर्वी दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 80 टक्क्यांची वाढ होत होती. आज शनिवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहेत. आजही दिल्ली-मुंबईसह देशातील चार महानगरांत आणि प्रमुख शहरांत इंधन दरात कोणाताही बदल करण्यात आलेला नाही. कंपन्यांनी सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दर स्थिर ठेवला आहे. याआधी तेल कंपन्यांनी सलग 14 वेळा किमतीत वाढ केली होती. यात इंधन दर 10.20 रुपयांनी वाढला होता. आता दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आहे. तर मुंबईत 120.51 रुपये लीटर भाव आहे. सर्वाधिक डिझेल दर मुंबईत 104.77 रुपये लीटर आहे. चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर 22 मार्चपासून सुरू झालेली पेट्रोल आणि डिझेलची किंमत 14 वेळा वाढल्यानंतर थांबली. पेट्रोल पंप डीलर्सचं म्हणणं आहे की जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर झाल्या आहेत, त्यामुळे कंपन्यांनीही त्यांच्या किमती वाढवणं थांबवलं आहे. असं असलं तरी, गेल्या 14 दरवाढीमध्ये पेट्रोल आणि डिझेल आधीच 10 रुपयांनी महाग झाले आहे आणि कंपन्यांना सध्याच्या किमतीत पूर्ण मार्जिनही मिळत आहे.

हे वाचा -  Pension Scheme: दरमाह गुंतवणूक करुन भविष्यात चिंतामुक्त व्हा; निवृत्तीनंतरही मिळेल 50 हजारांची पेन्शन

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या