मुंबई, 31 मे : कच्च्या तेलाचे भाव (Crude Oil Prices) पुन्हा गगनाला भिडल्याने इंधनाचे दर (Fuel Prices) पुन्हा वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमतही प्रति बॅरल 122 डॉलरच्या पुढे गेली. दरम्यान, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले असून त्यांच्यावरही तेलाच्या किमती वाढवण्याचा दबाव आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीच्या दबावातही कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत बदल केलेला नाही. आज सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 122.2 डॉलर होती, तर WTI प्रति बॅरल 117.8 डॉलरवर पोहोचली आहे. इतकेच नाही तर सौदी अरेबियासारख्या प्रमुख तेल उत्पादक देशांनी भारतासह आशियातील त्यांच्या खरेदीदारांसाठी क्रूडच्या किमतीत 2 डॉलरने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रिफायनरी कंपन्या खूप मार्जिन कमावत आहेत, त्यामुळे अधिक कमाई करण्यासाठी आम्हाला क्रूडच्या किमती देखील वाढवाव्या लागतील, असं त्यांनी म्हटलं. देशात सतत वाढत असलेल्या महागाईने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, 21 मे रोजी केंद्र सरकारने (Central Government) उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. . त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने तेलावरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटही कमी केला. एलॉन मस्क यांना जगात सर्वांत जास्त पगार; सातव्या क्रमांकावर आहेत ‘हे’ भारतीय; फॉर्च्युन 500च्या यादीत? वाचा चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर » मुंबई - पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर » दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर » चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर » कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. महागाईचा आणखी एक झटका; 1 जूनपासून महागणार या वस्तू, तुमच्यावर काय होणार परिणाम? तुम्ही नवीन दर याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.