JOIN US
मराठी बातम्या / मनी / पेट्रोल आणि सोनं दोन्हीही महाग, राज्यातल्या या शहरात पेट्रोलचे दर सगळ्यात जास्त

पेट्रोल आणि सोनं दोन्हीही महाग, राज्यातल्या या शहरात पेट्रोलचे दर सगळ्यात जास्त

गेले 4 दिवस सोन्याच्या दरांमध्ये झालेली घसरण थांबून आता सोन्याचे दर वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 सप्टेंबर : गेले 4 दिवस सोन्याच्या दरांमध्ये झालेली घसरण थांबून आता सोन्याचे भाव (gold rates today)वाढले आहेत . दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याची किंमत वाढून 38 हजार 560 रुपये झाली आहे. चांदीच्या किंमतींमध्येही तेजी आलीय. चांदीचा भाव 47 हजार 990 रुपये किलो झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याची किंमत 1 हजार 518 प्रतिऔंस झाली आहे. चांदीच्या किंमतीतही वाढ झाली असून चांदी 17.87 डॉलर प्रति औंस झाली आहे. जागतिक बाजारात किंमतींमध्ये वाढ झाल्यामुळेच सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत वाढ गेल्या 7 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होतेय. देशातल्या अनेक ठिकाणी पेट्रोलची किंमत प्रति लीटर 80 रुपये तर डिझेलची किंमत प्रति लीटर 70 रुपये झाली (Petrol Diesel Prices in India) आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा फटका सर्वसामन्यांना बसणार आहे. थॉमस कुक ट्रॅव्हल कंपनी एका रात्रीत बंद, 6 लाख पर्यटक अडकले सौदी अरेबियाची तेल कंपनी सौदी अराम्कोच्या दोन प्लँटवरच्या ड्रोन हल्ल्याचे परिणाम भारतात दिसू लागले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत. देशात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीमध्ये आहेत. परभरणीत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 81.51 रुपये आहे. तर डिझेलचा दर 81.40 रुपये आहे. सौदी अराम्कोवर ड्रोन हल्ला जगातल्या सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला झाला.. सौदी अरेबियातील या हल्ल्यानंतर भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. हुती या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या संघटनेला इराणचा पाठिंबा असल्याचा आरोप होतोय. सौदी अरामकोच्या दोन तेल प्लांटवर ड्रोन हल्ला (Saudi Aramco Drone Attack) करण्यात आला. हे दोन प्लांट अब्कॅक आणि खुरैस भागात आहेत. जवळपास दहाच्या आसपास ड्रोन पाठवण्यात आल्याचं बोललं जातंय. ======================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या