JOIN US
मराठी बातम्या / मनी / Petrol price Today : लाँग विकेण्डला जाण्याआधी टाकी फुल्ल करा, 'या' शहरात स्वस्त झालं पेट्रोल डिझेल

Petrol price Today : लाँग विकेण्डला जाण्याआधी टाकी फुल्ल करा, 'या' शहरात स्वस्त झालं पेट्रोल डिझेल

शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीतही आज अनेक ठिकाणी बदल दिसून आला.

जाहिरात

petrol diesel rate

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : जागतिक बाजारात क्रूडच्या किमतीत सातत्याने नरमाई सुरू आहे. ब्रेंट क्रूडची किंमत जवळपास 78 डॉलरपर्यंत घसरली आहे. शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीतही आज अनेक ठिकाणी बदल दिसून आला. एनसीआरमध्ये काही ठिकाणी तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे, तर काही शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत. गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल २८ पैशांनी घसरून ९६.६४ रुपये प्रति लिटर झाले. तर डिझेल २६ पैशांनी घसरले आणि ८९.८२ रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

या 5 टिप्स करा फॉलो, कमी इंधनात जास्त मायलेज देईल तुमची कार!

गाझियाबादमध्ये पेट्रोल 32 पैशांनी वाढून 96.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 30 पैशांच्या वाढीसह 89.75 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महागून 96.57 रुपये, तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिट, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटरवर दर पोहोचले आहेत.

FD साठी पैसे गुंतवण्याची घाई करेल नुकसान, कोण देतंय जास्त रिटर्न इथे चेक करा

संबंधित बातम्या

रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. तुमच्या शहरातील दर तुम्ही SMS वर जाणून घेऊ शकता. पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, इंडियन ऑइलच्या ग्राहकाने RSP<डीलर कोड> हा चेक 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस करू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर पाठवू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या