Paytm
मुंबई, 24 मार्च : पेटीएमच्या मालकीच्या One97 Communications लिमिटेडच्या शेअर्समध्ये 24 मार्चच्या आजच्या ट्रेडिंगमध्ये सुमारे 13 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. यासोबतच आज या शेअरही प्रचंड तेजी दिसून आली. आज पेटीएमच्या शेअर्समध्ये गेल्या 4 महिन्यांतील सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. आजच्या व्यवहारात बीएसईवर पेटीएमच्या शेअरने 13 टक्क्यांच्या वाढीसह 592.40 रुपयांची पातळी गाठली. 24 नोव्हेंबर 2021 नंतर स्टॉकमधील ही सर्वात मोठी रॅली होती. दुपारी 3 वाजेच्या सुमारास, हा स्टॉक त्याच्या मागील बंदच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढून 578 रुपयांच्या जवळ व्यवहार करत होता. लिस्ट झाल्यापासून हा शेअर घसरत आहे. आतापर्यंत, शेअर त्याच्या 2,150 च्या इश्यू किंमतीपासून 70 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. पेटीएमचा शेअर स्टॉक 18 नोव्हेंबर 2021 रोजी बाजारात लिस्ट झाला. तेव्हापासून त्याच्या मार्केट कॅपमध्ये 1 लाख कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. Dolat Capital ने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नोटमध्ये या स्टॉकला बाय रेटिंग देताना आपले टार्गेट 2500 रुपयांवरून 1620 रुपये केले आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखल्यामुळे, कंपनीच्या आर्थिक स्थितीवर थोडासा परिणाम होणार आहे, परंतु ग्रोथ कॉन्फिडन्सवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. Dolat Capital चे असेही म्हणणे आहे की RBI च्या या कृतीचा दीर्घकालीन Paytm च्या महसूल वाढीवर सुमारे 100 बेस पॉइंट्सचा नकारात्मक प्रभाव पडेल. Bank Strike : महिनाअखेर बँका सलग चार दिवस बंद राहणार, गैरसोय टाळण्यासाठी कामे आधीच करुन घ्या अलीकडेच ब्रोकरेज फर्म Macquarie ने देखील या स्टॉकची टार्गेट प्राईज 39 टक्क्यांनी कमी करून 450 रुपये केली आहे. Macquarie ने म्हटलं की गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये बॉटम फिशिंग टाळावी. त्याच वेळी ब्लूमबर्गच्या मते, पेटीएमला 4 बाय, 2 होल्ड आणि 3 सेल रेटिंग मिळाले आहेत. मंगळवारी बीएसईने पेटीएमच्या शेअरमधील तीव्र घसरणीबद्दल One97 Communications कडून स्पष्टीकरण मागवले होते. पेटीएमने बुधवारी बीएसईच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की कंपनी आणि तिचा व्यवसाय पूर्णपणे मजबूत आहे. वेळोवेळी ते बीएसईला सर्व आवश्यक माहिती निर्धारित वेळेत देत असल्याचेही म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, कंपनी हे देखील सांगू इच्छिते की बिझनेस फंडामेंटल मजबूत आहेत, जसे की 4 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये दिसून आले. PF Account एक, फायदे अनेक; फ्री इन्शुरन्ससह आणखी काय सुविधा मिळतात? चेक करा One97 Communications ने पुढे म्हटलं की, आम्ही हे पुनरुच्चार करू इच्छितो की कंपनी लिस्टिंगबाबतच्या नियमांचे पालन करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे. कोणतीही माहिती/घोषणा ज्याचा कंपनीच्या शेअरच्या किंमतीवर आणि व्हॉल्यूमवर परिणाम होऊ शकतो, ती स्टॉकला कळवली जाईल.