मुंबई, 11 मार्च : पेटीएमचा कंपनीचा शेअर (Paytm Share) लिस्टिंगपासून खाली खाली घसरत आहे. एका बाजूला शेअर बाजारातील पडझड तर आता कंपनीला रिझर्व्ह बँक इंडियानेही (Reserve Bank Of India) मोठा झटका दिला आहे. 11 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला (Paytm Payments Bank) नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. यासोबतच आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेचे आयटी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. आयटी ऑडिटचा अर्थ असा आहे की कंपनीचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच सॉफ्टवेअर अनेक ग्राहकांचा भार उचलण्यास सक्षम आहे, त्यात काय त्रुटी आहेत आणि त्या का येत आहेत, या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल. आरबीआयने म्हटले आहे, नवीन ग्राहक जोडण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेला आरबीआयची परवानगी घ्यावी लागेल. आणि आरबीआय आयटी ऑडिटच्या अहवालांचे पुनरावलोकन केल्यानंतरच नवीन ग्राहकांना जोडण्याची परवानगी दिली जाईल. LIC IPO : LIC ची तिसऱ्या तिमाहीत बंपर कमाई, नेट प्रॉफिट 258 पटीने वाढला व्यवसाय कधी सुरू झाला? पेटीएम पेमेंट्स बँकेने 23 मे 2017 रोजी काम सुरू केले. 9 मार्च रोजी मनी कंट्रोलने कळवले होते की विजय शेखर शर्मा यांची कंपनी पेटीएम पेमेंट्स बँक स्मॉल फायनान्स बँक (SFB) परवान्यासाठी RBI कडे अर्ज करणार आहे. याबद्दली माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की पेटीएम पेमेंट्स बँक या वर्षी जूनपर्यंत अर्ज सबमिट करू शकते. मात्र, त्याआधीच आरबीआयच्या निर्णयाने कंपनीला मोठा धक्का बसला आहे. शेअर्सच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण पेटीएम आयपीओमध्ये कंपनीने शेअर्सची इश्यू किंमत 2150 रुपये ठेवली होती. पण शेअर लिस्टिंगच्या दिवशीच गदारोळ झाला, आणि शेअर्स 1950 रुपयांना लिस्ट झाले. त्यानंतर शेअर्समध्ये घसरण होत राहिली. कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 18 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले होते. परंतु हे शेअर्स त्यांच्या इश्यू किंमतीपर्यंत जाऊ शकले नाहीत. आज हे शेअर्स इश्यू किंमतीच्या जवळपास 3 पट घसरले आहेत. सध्या पेटीएम शेअरची किंमत 776.15 रुपयांवर आहे. Property खरेदी करण्याआधी नक्की तपासून पाहा हे 5 दस्तावेज, नाहीतर होऊ शकते फसवणूक जेव्हा पेटीएमचे शेअर्स लिस्ट केले गेले, तेव्हा त्याचे मार्केट कॅप 1.39 लाख कोटी रुपये होते. पण शेअर घसरल्याने मार्केट कॅप अवघ्या 4 महिन्यांत 50 हजार कोटींवर आले आहे. शु्क्रवारी (11 मार्च 2022) मार्केट कॅप 50.26 हजार कोटींवर आली आहे. पेटीएम, देशातील सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक असून त्याचा सुरुवातीला खूप गाजावाजा झाला होता. पण यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.