JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / तुमचे PAN Card नकली तर नाही ना? वाचा कशाप्रकारे माहित करुन घ्याल

तुमचे PAN Card नकली तर नाही ना? वाचा कशाप्रकारे माहित करुन घ्याल

क्यूआर कोड तुमचे पॅन कार्ड असली आहे की बनावट याची ओळख करुन देतो. तुम्ही स्मार्टफोन आणि इन्कम टॅक्स विभागाच्या अॅपच्या साहाय्याने पॅन कार्डची सत्यता जाणून घेऊ शकता.

0105

गेल्या काही काळापासून डिजिटल सुविधांचा वापर वाढला आहे. पण ज्याप्रमाणे या सोयीसुविधा वाढत आहेत, त्याच प्रमाणात फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहेत. खोटी ओळखपत्र ही देखील मोठी समस्या निर्माण झाली आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र या दस्तावेजांसह देखील छेडछाड केली जाते.

जाहिरात
0205

सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणे आवश्यक झाले आहे. या दरम्यान पॅन कार्डसंदर्भातील फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत.

जाहिरात
0305

फ्रॉड पॅन कार्डच्या घटनांनंतर इन्कम टॅक्स विभागाने पॅन कार्ड आयडीमध्ये क्यूआर कोड जोडणे सुरू केले आहे. आता जेवढे पॅन कार्ड बनवले जात आहेत, त्यात क्यूआर कोड एम्बेडेड असतो. हाच क्यूआर कोड पॅन कार्ड खरं आहे की बनावट याची ओळख आहे. तुम्ही स्मार्टफोन आणि इन्कम टॅक्स विभागाच्या अॅपच्या मदतीने पॅन कार्डवरील क्यूआर कोडद्वारे त्याची सत्यता पडताळून पाहू शकता.

जाहिरात
0405

पॅन कार्डची करा पडताळणी- याकरता सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाचे पोर्टल www.incometax.gov.in/iec/foportal यावर जावे लागेल. याठिकाणी Verify your PAN च्या लिंकवर क्लिक करा. नवीन पेज ओपन झाल्यावर तिथे तुमची सर्व माहिती प्रविष्ट करा. नंबर, पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक ही माहिती प्रविष्ट केल्यानंतर पोर्टलवर एक मेसेज येईल की तुम्ही दिलेली माहिती पॅनकार्डच्या डेटाशी जुळते आहे की नाही. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या पॅनची पडताळणी करू शकता.

जाहिरात
0505

पॅनकार्ड हा महत्त्वाचा सरकारी दस्तावेज आहे. बँकिंग किंवा इतर आर्थिक कामांमध्ये PAN आवश्यकता असते. बँक खाते उघडणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा विकणे, वाहन खरेदी करणे किंवा विक्री करणे, आयटीआर दाखल करणे, 2 लाख रुपयांपेक्षा जास्त दागिने खरेदी करणे यासह अशी अनेक कामे आहेत ज्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या