JOIN US
मराठी बातम्या / मनी / IPO मध्ये गुंतवणुकीची संधी, Metro ब्रँड्सचा आईपीओ 10 डिसेंबरला ओपन होणार

IPO मध्ये गुंतवणुकीची संधी, Metro ब्रँड्सचा आईपीओ 10 डिसेंबरला ओपन होणार

IPO मधून मिळणारे पैसे कंपनी ‘मेट्रो’, ‘मोची’, ‘वॉकवे’ आणि ‘क्रॉक्स’ या ब्रँड अंतर्गत नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट व्यवसायासाठी वापरतील. सध्या कंपनीची देशातील 134 शहरांमध्ये 586 स्टोअर्स आहेत.

जाहिरात

एखादा आयपीओ चांगला असेल आणि तुम्हाला त्यात गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला त्याचे शेअर्स मिळावेत, अशी इच्छा असेल तर तुम्ही...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 डिसेंबर : राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची गुंतवणूक असलेल्या मेट्रो ब्रँड्स लि. चा IPO 10 डिसेंबर रोजी ओपन होणार आहे. फुटवेअर क्षेत्रातील किरकोळ विक्रेते मेट्रो ब्रँड्स IPO अंतर्गत 295 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करतील. याशिवाय, प्रमोटर्स आणि इतर भागधारक 2.14 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आणतील. IPO कागदपत्रांनुसार, कंपनीचा इश्यू 14 डिसेंबर रोजी बंद होईल. IPO च्या माध्यमातून कंपनीचे प्रमोटर्स त्यांचे जवळपास 10 टक्के स्टेक विकतील. IPO नंतर कंपनीतील प्रमोटर्स आणि प्रमोटर समुहाची भागीदारी सध्याच्या 85 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर येईल. IPO मधून मिळणारे पैसे कंपनी ‘मेट्रो’, ‘मोची’, ‘वॉकवे’ आणि ‘क्रॉक्स’ या ब्रँड अंतर्गत नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट व्यवसायासाठी वापरतील. सध्या कंपनीची देशातील 134 शहरांमध्ये 586 स्टोअर्स आहेत. यापैकी गेल्या तीन वर्षांत 211 दुकाने सुरू झाली आहेत. येत्या 8 डिसेंबरला Shriram Properties चा आयपीओ येणार बंगळुरूमधील रिअल इस्टेट कंपनी (Real Estate Company) श्रीराम प्रॉपर्टीजचा (Shriram Properties) IPO पुढील आठवड्यात 8 डिसेंबर 2021 रोजी सुरू होईल. हा IPO 600 कोटी रुपयांचा असेल. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, हा IPO 10 डिसेंबर रोजी बंद होईल. श्रीराम प्रॉपर्टीजच्या या IPO मध्ये 250 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, यामध्ये ऑफर फॉल सेलसाठी (Offer  For Sell) 350 कोटी रुपयांची ऑफर देखील समाविष्ट आहे. OFS अंतर्गत, कंपनीचे प्रमोटर्स आणि गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स ऑफर फॉर सेलसाठी आणतील. ऑफर फॉर सेल अंतर्गत, कंपनीच्या गुंतवणूकदारामध्ये ओमेगा टीसी सेबर होल्डिंग्ज 90.95 कोटी रुपयांचे आणि टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस 8.34 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स विकतील. याशिवाय, TPG Asia SF V Pte Ltd आणि WSI/WSQI V (XXXII) मॉरिशस देखील अनुक्रमे 92.21 कोटी आणि 133.5 कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकतील. तसेच इतर काही शेअरहोल्डर्स देखील सुमारे 25 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या