मुंबई : अनेक ठिकाणी कर्मचारी कमी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये आता ओल कंपनी देखील उतरली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. कंपनीने 200 जणांना नोटीस पाठवली आहे. ओलाच्या सॉफ्टवेअर टीममधील काही कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे. या कर्मचाऱ्यांना पिंक स्लीप ओलानं पाठवली आहे. पिंक स्लीप पाठवणं म्हणजे कंपनीला आता तुमची गरज नाही अशा प्रकारे याचा अर्थ होतो. त्यामुळे कंपनी या कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती टीव्ही 18 ला सूत्रांकडून मिळाली आहे. ओलाची कंपनी एएनआय टेक्नोलॉजीजने वेगवेगळ्या सॉफ्टवेअरवर काम करणाऱ्यांना कामावरून काढण्याचा विचार करत करत आहे. ज्या कर्मचाऱ्यांना ही नोटीस देण्यात आली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त कर्मचारी हे ओला अॅपचे असल्याची माहिती मिळाली आहे. ओला इलेक्ट्रीक स्कूटरच्या विक्रीमध्ये कमालीची घट आली आहे. त्यानंतर हा निर्णय घेतल्याने सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर याची चर्चा सुरू झाली आहे. हे वाचा- खुशखबर! Driving License काढणं आणखी सोपं, घरीच उपलब्ध होणार 57 सेवा ओला कंपनीच्या इलेक्ट्रीक गाडीमध्ये ग्राहकांकडून अनेक तक्रारी देखील आल्या आहेत. एप्रिल महिन्यात कंपनीने एकूण बारा हजार ६९१ स्कूटरची विक्री केली होती. त्यानंतर प्रत्येक महिन्यात वाढणाऱ्या तक्रारी आणि विक्रीत होणारी कमी यामधील ताळमेळ बसवताना नाकीनऊ येत आहेत. ऑगस्ट महिन्यात फक्त तीन हजार ३५१ स्कूटर विकल्या गेल्या. ओलाची ई स्कूटर गेल्या सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आली होती. याला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. मात्र ओलाच्या स्कूटरची विक्री दिवसेंदिवस कमी होत असल्याचं दिसत आहे. हे वाचा- सणासुदीला घरी जायचं असेल तर आता रेल्वे बुकींगचं टेंशन सोडा! IRCTC चं हे फिचर वापरा ओलाच्या किती कर्मचाऱ्यांना काढणार याबाबत प्रवक्त्यांना विचारलं असता त्यांना बोलणं टाळलं. याआथी २ हजार कर्मचाऱ्यांना कंपनीने नारळ दिला आहे. त्यामुळे आता 200 की त्यापेक्षा जास्त कर्मचारी काढणार याची धाकधाकू आहे. ओलाच्या या अॅक्शनवर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे तर ओला कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.