मुंबई, 25 जानेवारी: राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजनेतून पैसे काढण्यासाठी PFRD नवीन नियम लागू करणार आहे. हा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. या नियमानुसार काही कागदपत्रे देणे बंधनकारक असेल. जर सदस्यांनी ही कागदपत्रे अपलोड केली नाहीत तर ते NPS मधून पैसे काढू शकणार नाहीत. 22 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या सर्कुलरमध्ये म्हटले आहे की, ग्राहकांना केवायसी कागदपत्रे देणे बंधनकारक असेल. PFRDA ने नोडल अधिकारी आणि ग्राहकांना ही कागदपत्रे अनिवार्य अपलोड करणे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास एनपीएसचे पैसे रोखले जाऊ शकतात.
पैसे काढण्यापूर्वी, तुम्ही NPS पैसे काढण्याचा फॉर्म अपलोड केला आहे की नाही हे कंफर्म करा. पैसे काढण्याच्या फॉर्ममधील माहिती ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्यानुसार भरली पाहिजे. बँक अकाउंट प्रूफ, PRAN किंवा पर्मानेंट रियाटरमेंट अकाउंट नंबर कार्डची एक कॉपी देखील असावी. यापैकी कोणतेही डॉक्यूमेंट अपलोड न केल्यास NPS मधून पैसे काढता येणार नाहीत.
LIC पॉलिसी बंद करण्याचा विचार करताय? जाणून घ्या काय आहेत नियम-CRA सिस्टमवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी लॉग इन करा. -ई-साइन, ओटीपी प्रमाणीकरणावर आधारित लॉगिनसाठी रिक्वेस्ट पाठवू शकता. -अॅड्रेस, बँक डिटेल्स, नॉमिनी डिटेल्स यासारखी माहिती रिक्वेस्ट दरम्यान ऑटो अपलोड केली जाईल. -आता ग्राहकाला एकरकमी एन्युटी रक्कम आणि डिटेल सेलेक्ट करावे लागतील. -यानंतर तुमचे बँक अकाउंट व्हेरिफाय करावे लागेल. -तसेच ओळख आणि अॅड्रेस प्रूफ, PRAN कार्ड आणि बँक प्रूफ म्हणून KYC कागदपत्रे अपलोड करण्याची रिक्वेस्ट करा. -स्कॅन केलेले कागदपत्र आणि स्कॅन केलेला फोटो असणे आवश्यक आहे. -ग्राहक आधारच्या मदतीने OTP प्रमाणीकरण आणि ई-साइनचा वापर करुन ही प्रोसेस पूर्ण करू शकतात.
सध्या एनपीएस सब्सक्रायबर एकूण कॉपर्समधून 60 टक्के पर्यंत रक्कम एकरकमी विड्रॉल करु शकता. तर 40 टक्के कॉपर्सला यूटिलाइज करु शकता. जर तुमचा एकूण एनपीएस कॉपर्स 5 लाख आहे. तर मॅच्योरिटी पूर्ण झाल्यानंतर सब्सक्राइबर यामधून 60 टक्के रक्कम काढू शकतील. तर प्रीमॅच्योरिटीपूर्वी विड्रॉल केल्यास 80 टक्के कॉपर्समधून अॅन्युटी खरेदी करण्याची आवश्यकता असेल.
किती प्रकारचे असतात बँक अकाउंट? तुमच्यासाठी कोणतं योग्य? घ्या जाणून