JOIN US
मराठी बातम्या / मनी / खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सरकारही चिंतीत; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितली दर कमी करण्यासाठी काय असेल रणनिती?

खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सरकारही चिंतीत; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितली दर कमी करण्यासाठी काय असेल रणनिती?

युक्रेन आणि रशियामधील (Ukraine-Russia War) संघर्षानंतर भारत खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात आहे. भारत खाद्यतेलाचा मोठा भाग आयात करतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे : खाद्यतेलाच्या किमती (Edible Oil Prises) वाढल्याने सरकार चिंतेत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सांगितले की, युक्रेन आणि रशियामधील (Ukraine-Russia War) संघर्षानंतर भारत खाद्यतेलाच्या आयातीसाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात आहे. भारत खाद्यतेलाचा मोठा भाग आयात करतो. सीतारामन यांच्या मते, दोन्ही देशांमधील संघर्षामुळे भारताला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, सर्वांना माहित आहे की रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. तेल आयात करताना अनेक अडचणी येतात. आपल्याला माहित आहे की आपण खाद्यतेल आयात करू शकत नाही. आम्ही तिथून सूर्यफूल तेल घेत होतो. सरकार आता इतर अनेक बाजारातून खाद्यतेल आयात करत आहे आणि नवीन बाजारपेठांकडेही लक्ष देत आहे. PNB खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेच्या अनेक सुविधांच्या शुल्कात बदल, चेक करा नवे नियम युक्रेन-रशिया संघर्षामुळे निर्यातीसाठी त्या बाजारपेठांमध्ये उद्योगपतींनाही संधी निर्माण झाली आहे. यापूर्वी युक्रेन आणि रशिया काही बाजारपेठांमध्ये निर्यात करत होते. आता त्यांची निर्यात होत नाही. त्या देशांमध्ये निर्यात करण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येक आव्हानाचे संधीत रूपांतर करण्याची संधी उद्योगपतींनी पाहिली पाहिजे. केंद्र सरकार त्यांच्या पाठिंब्यासाठी सदैव तत्पर आहे, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. Business Idea: खर्च कमी, उत्पन्न जास्त; कोरफडीची लागवड करून कमवा 5 पट नफा

 इंडोनेशियाकडून निर्यातीवर बंदी

इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताला पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत. कच्चे सोयाबीन तेल प्रामुख्याने अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आयात केले जाते. तर क्रूड सूर्यफूल तेल युक्रेन आणि रशियामधून आयात केले गेले आहे. खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा इंडोनेशियाचा निर्णय आणि इतर कारणांमुळे तेलाच्या किमती गगनाला भिडत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या