JOIN US
मराठी बातम्या / मनी / New ITR Filing Rule: नवीन प्रस्तावित आयटीआर फायलिंग नियम काय आहे, करदात्यांना त्याचा कसा फायदा होईल?

New ITR Filing Rule: नवीन प्रस्तावित आयटीआर फायलिंग नियम काय आहे, करदात्यांना त्याचा कसा फायदा होईल?

New ITR Filing Rule: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आयटीआर (ITR) फाइलिंगसाठी नवीन नियम प्रस्तावित केला आहे. नवीन नियमांनुसार करदात्यांना आता संबंधित मूल्यांकन वर्ष संपल्यानंतर दोन वर्षांपर्यंत त्यांचे रिटर्न अपडेट करण्याची परवानगी असेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या 2022 च्या अर्थसंकल्पीय भाषणात नियमित करदात्यांना प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याच्या नियमांमध्ये सुधारणांची घोषणा केली. नवीन नियमांनुसार, करदात्यांना आता संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीनंतर दोन वर्षांपर्यंत त्यांचे विवरणपत्र अपडेट करण्याची परवानगी असेल, जर ते प्रथमच विवरणपत्र भरताना कोणतेही उत्पन्न समाविष्ट करण्यास विसरले असतील. निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘स्वैच्छिक कर अनुपालनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल’ असे वर्णन केले. वास्तविक, अतिरिक्त उत्पन्न आणि व्याजावर 25% ते 50% अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. अपडेटेड आयटीआर (Updated ITR) 12 महिन्यांत दाखल केल्यास कर आणि देय व्याजावर अतिरिक्त 25% भरावे लागतील. जर 12 महिन्यांनंतर संबंधित मूल्यांकन वर्ष (AY) संपण्याच्या 24 महिन्यांपूर्वी दाखल केल्यास हा दर 50% पर्यंत वाढेल. आयकर कायदा 1961 अंतर्गत कलम 139 मध्ये नवीन उपकलम (8A) लागू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या आयकर विभागाला असे आढळल्यास करदात्यांना निर्णयाच्या दीर्घ प्रक्रियेतून जावे लागते. Crypto Vs Digital Currency: क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सीमध्ये काय फरक आहे? नवीन नियमांचा अर्थ काय आहे?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या