मुंबई, 23 फेब्रुवारी : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्शन सिस्टम (National Pension Scheme) च्या सेवा शुल्कात वाढ केली आहे. PFRDA च्या परिपत्रकानुसार, POP आउटलेटवर NPS शी संबंधित सेवा शुल्क 1 फेब्रुवारी 2022 पासून वाढवण्यात आले होते. NPS अंतर्गत POP साठी सुधारित शुल्क सुरुवातीच्या ग्राहकांसाठी नोंदणी शुल्क आता 200 रुपयांवरून 400 रुपये करण्यात आले आहे. प्रारंभिक आणि त्यानंतरचे व्यवहार शुल्क योगदानाच्या 0.50 टक्के पर्यंत आहे. किमान 30 रुपये आणि कमाल 25,000 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. परसिस्टेंसी : एका आर्थिक वर्षात 6 महिन्यांपेक्षा जास्त आणि किमान योगदान रुपये 1,000 ते रुपये 2,999: प्रति वर्ष 50 रुपये रु.3000 ते रु 2999 च्या किमान योगदानासाठी: रु. 50 प्रतिवर्ष रु.3000 ते रु.6000 च्या किमान योगदानासाठी: रु.75 प्रतिवर्ष रु. 6000 वरील किमान योगदानासाठी: रु. 100 प्रतिवर्ष ENPS द्वारे त्यानंतरचे योगदान: योगदानाच्या 0.20% (किमान रु. 15, कमाल रु 10,000) (एकरकमी जमा) निर्गमन आणि पैसे काढण्याच्या सेवेसाठी प्रक्रिया शुल्क: कॉर्पसच्या 0.125 टक्के किमान रु. 125 आणि कमाल रु. 500 सह आगाऊ आकारले जातील. Gold Price Today:दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोने दर घसरला,पाहा 10ग्रॅमचा आजचा दर हे शुल्कही वाढले 15 फेब्रुवारी 2022 पासून ENPS द्वारे त्यानंतरच्या सर्व योगदानांवरील शुल्क 0.20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे, किमान शुल्क 15 रुपये आणि कमाल 10,000 रुपये आहे. ईएनपीएसमध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांसाठी हे सेवा शुल्क लागू होणार नाही. NPS हे मार्केट लिंक्ड, डिफाइन काँट्रीब्यूशन परिभाषित-योगदान उत्पादन आहे ज्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीच्या फंडामध्ये नियमितपणे गुंतवणूक करणे आवश्यक असते.