नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : भारतातल्या कार उद्योगाला आर्थिक मंदीचा जास्त फटका बसलाय. एकेकाळी सर्वसामान्यांना परवडणारी कार अशी ख्याती असलेल्या नॅनो गाड्यांपैकी एकच कार विकली गेलीय. गेल्या 9 महिन्यांत फक्त फेब्रुवारीमध्ये एक नॅनो विकली गेली. टाटा मोटर्सने नॅनो कारच्या एकाही युनिटमध्ये कारचं उत्पादन केलेलं नाही. असं असलं तरी या कंपनीने कारचं उत्पादन बंद झाल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीप्रमाणे नॅनोची विक्री आणि उत्पादन दोन्ही बंद आहे. टाटाने 2008 मध्ये नॅनोचं उत्पादन सुरू केलं. सामान्य लोकांसाठी कार देण्याचं स्वप्न घेऊन ही कार बाजारात आणण्यात आली. सुरुवातीला या कारची चांगली विक्री झाली पण नंतर मात्र तिला फारशी मागणी नव्हती. (हेही वाचा : मुहूर्तावर सोन्याचा भाव वाढला; गेल्या दहा वर्षांतला सर्वांत महागडा दसरा) गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात टाटा मोटर्सने 299 गाड्यांची विक्री केली होती. नॅनोचं उत्पादन बंद करण्याबद्दल टाटा मोटर्सच्या म्हटलं आहे, कोणत्याही उत्पादनाबदद्ल निर्णय घेताना समग्रपणे घ्यावा लागेल. बाजारपेठेतल्या घडामोडी, प्रतिस्पर्धी कंपन्या या सगळ्याचा विचार करून मगच नॅनोचं उत्पादन बंद करण्याबद्दल विचार केला जाईल. असं असलं तरी नॅनोचं उत्पादन आणि विक्री एप्रिल 2020 पर्यंत बंद होईल. 2009 मध्ये जेव्हा ही कार लाँच झाली तेव्हा तिची किंमत 1 लाख रुपये होती. ======================================================================================== युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO