JOIN US
मराठी बातम्या / मनी / मुंबईत आहे भारतातील सर्वांत महागडं पेंट हाऊस; 240 कोटी रुपयांना झालं डील

मुंबईत आहे भारतातील सर्वांत महागडं पेंट हाऊस; 240 कोटी रुपयांना झालं डील

सध्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मुंबईतील एका पेंट हाउस डिलची फार चर्चा आहे. या पेंट हाऊसचं 240 कोटींना डील झाल्याचं वृत्त आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 फेब्रुवारी :  महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोट्यवधी लोक राहतात. कॉस्मॉपॉलिटन शहर असलेल्या मुंबईमध्ये घरांच्या किंमती प्रचंड आहेत. तिथे चांगल्या परिसरामध्ये स्वत:च्या मालकीचं घर घेण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. सध्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मुंबईतील एका पेंट हाउस डिलची फार चर्चा आहे. वरळीतील एका लक्झरी टॉवरमधील पेंट हाउस 240 कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. एका उद्योगपतीनं घेतलेलं हे पेंट हाउस बहुधा भारतातील सर्वांत महागडं पेंट हाउस ठरलं असण्याची शक्यता आहे. मार्केटमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गगनचुंबी इमारतीतील ‘टॉवर बी’मध्ये 63व्या, 64व्या आणि 65व्या मजल्यावर हे पेंट हाउस आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय आहे खास? टाइम्स ऑफ इंडियाला मिळालेल्या माहितीनुसार, वेलस्पन ग्रुपचे चेअरमन बी. के. गोयंका यांनी हे वरळी येथील  अ‍ॅनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्ट इमारतीमधील हे ट्रिपलेक्स खरेदी केलं आहे. हे पेंट हाउस 30 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर उभं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, हे पेंट हाउस सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडपट्टीतील कुटुंबाला दिलेल्या मोफत 300 चौरस फूट सदनिकेच्या 100 पट आकाराचं आहे. या व्यवहाराची बुधवारी नोंदणी झाली असून, खरेदीदार गोयंका हे या पेंट हाउसमध्ये राहण्याचा विचार करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. Kala Ghoda : प्रवेशद्वारातूनही दिला सामाजिक संदेश, तुमच्या लक्षात आला का? Video लिआसेस फोराज (Liases Foras) या रिअल इस्टेट रेटिंग आणि रिसर्च फर्मचे संस्थापक व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर म्हणाले, “भारतात आजपर्यंत विकले गेलेलं हे सर्वांत महागडं अपार्टमेंट आहे. आम्हाला पुढील दोन महिन्यांत अल्ट्रा-लक्झरी सेगमेंटमध्ये असे आणखी सौदे होण्याची अपेक्षा आहे. कारण, एप्रिल 2023 पासून कलम 54 अंतर्गत गुंतवणुकीला परवानगी असलेला भांडवली नफा 10 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित केला गेला आहे. त्यामुळे, 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली नफ्यावर आपोआप कर आकारला जाईल. म्हणून मार्च अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात मालमत्ता गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.” थ्री सिक्स्टी वेस्ट टॉवरच्या शेजारील आणखी एक पेंट हाउस 240 कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. बिल्डर विकास ओबेरॉय यांनी उद्योगपती व बिल्डर सुधाकर शेट्टी यांच्याशी भागीदारी करून ही लक्झरी मालमत्ता खरेदी केली आहे. ओबेरॉय यांनी आपल्या आर. एस. इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत स्वत:च्याच प्रकल्पातील पेंट हाउस विकत घेतल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, ओबेरॉय यांच्या ओबेरॉय रियल्टीनं ही मालमत्ता विकसित करणाऱ्या ओअॅसिस रियल्टी ही भागीदारी फर्म विकत घेतली आहे. आता ‘ओअॅसिस रियल्टी’ हा सुधाकर शेट्टी यांच्या सहाना आणि ओबेरॉय रियल्टी यांचा संयुक्त प्रॉजेक्ट ठरणार आहे. गेल्या आठवड्यात, ओबेरॉय रियल्टीनं स्टॉक एक्स्चेंजला (बीएसई आणि एनएसई) माहिती दिली होती की, त्यांनी चार हजार कोटी रुपयांना संपूर्ण थ्री सिक्स्टी वेस्ट विकत घेतलं आहे. त्यांनी 5.25 लाख चौरस फूट क्षेत्र खरेदी केलं आहे ज्यात 63 अपार्टमेंटचा समावेश आहे. क्रेडिट कार्डने रेंट भरता? मग ही माहिती असायलाच हवी गेल्या काही वर्षांतील महागडे डील 1. 2015मध्ये जिंदाल ड्रग्ज ही फार्मा कंपनी चालवणाऱ्या जिंदाल कुटुंबानं लोढा अल्टामाउंटमध्ये दहा हजार स्वेअर फूटांचं अपार्टमेंट खरेदी केलं होतं. त्यासाठी त्यांनी 160 कोटी रुपये खर्च केले होते. 2. गेल्यावर्षी (2022) अभिनेता रणवीर सिंहनं वांद्रे बँडस्टँड येथील सागर संगम इमारतीमध्ये स्कॉड्र्युप्लेक्स खरेदी केलं आहे. त्यासाठी त्यानं 119 कोटी रुपये मोजले होते. 3. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये देवव्रत डेव्हलपर्सनं प्रभादेवीतील 25 साउथमध्ये पाच अंडर कन्स्ट्रक्शन अपार्टमेंट्स खरेदी केले होते. त्यासाठी त्यांना 113 कोटी रुपये द्यावे लागले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या