आर्थिक राशिभविष्य.
आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (28 जुलै 2022) राशिभविष्य मेष (Aries) : आज दैनंदिन उत्पन्नावर विपरीत परिणाम होईल. काही वायफळ खर्च कराल. बिझनेसमध्ये प्रगती, सुधारणा होण्यासाठी खूप कष्ट करण्याची गरज आहे. कौटुंबिक खर्च स्थिर राहतील. वृषभ (Taurus) : आज आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. भविष्यातल्या बचतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. खासगी व्यवसाय नफा कमावण्यास मदत करतील. ऑफिसमध्ये उच्चपदस्थांबरोबर तुम्ही तुमच्या प्रमोशनविषयी चर्चा करू शकाल. मिथुन (Gemini) : बिझनेसच्या संदर्भात कोर्टाची पायरी चढावी लागण्याची शक्यता आहे; मात्र केसचा निकाल तुम्हाला अनुकूल लागेल. बिझनेसमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कौटुंबिक खर्च वाढतील. तुमच्या भावंडाकडून तुम्हाला आर्थिक मदत केली जाईल. कर्क (Cancer) : बिल पेमेंट्समधून काही तोटा होण्याची शक्यता आहे. विनाकारण प्रवास केल्यास पैसे वाया जातील. बँकेशी संबंधित कामातून तुम्हाला काही आर्थिक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. दैनंदिन उत्पन्न वाढेल. कौटुंबिक खर्च स्थिर राहतील. सिंह (Leo) : सासरकडच्या मंडळींकडून तुम्हाला फायदा होण्यासाठी मदत केली जाईल. आजोळकडची नातेवाईक मंडळीही तुम्हाला साह्य करायला पुढे येतील. आर्थिक बजेट अडचणीत येईल. बिझनेस फार चांगला चालणार नाही. कन्या (Virgo) : बिझनेसला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. आर्थिक अस्थैर्यामुळे कुटुंबात वाद होण्याची शक्यता. रिअल इस्टेटशी संबंधित गोष्टींमध्ये नफा होण्याची शक्यता. तूळ (Libra) : कोणाला तरी आर्थिक मदत केल्याचा तुम्हाला पश्चात्ताप होईल. वैवाहिक जीवनात खर्च वाढतील. बिझनेसमध्ये उधार दिलेले पैसे परत मिळतील. दैनंदिन उत्पन्न स्थिर राहील. वृश्चिक (Scorpio) : बिझनेस ट्रिप्समुळे आर्थिक तोटा होईल. दैनंदिन उत्पन्न सुधारेल. घरखर्च बऱ्यापैकी स्थिर राहतील. वडिलोपार्जित संपत्तीबद्दल तुम्ही सावध राहायला हवं. धनू (Sagittarius) : आर्थिक विषयाशी संबंधित परिस्थितीबद्दल तुम्ही सावध राहिलं पाहिजे. खासगी बिझनेसमधल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळेल आणि त्यांचं दैनिक उत्पन्न सुधारेल. कुटुंबातला एखादा सदस्य तुमच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करील. त्यातून वाद होऊ शकेल. मकर (Capricorn) : कुंभ (Aquarius) : तुम्हाला आज बिझनेसमध्ये आर्थिक स्थिरता अनुभवाला येईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आज आर्थिक विषयातला कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आज काही गरज नसलेले घरखर्च होतील. मीन (Pisces) : आज पैशांची बचत करणं खूप अवघड ठरेल. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. बिझनेसमधल्या तोट्यामुळे दैनंदिन उत्पन्नावर परिणाम होईल. प्रॉपर्टी खरेदी करण्याचं नियोजन करू शकाल.