JOIN US
मराठी बातम्या / मनी / खूशखबर : मोदी सरकार कराबद्दल करणार मोठी घोषणा; सामान्यांना दिलासा?

खूशखबर : मोदी सरकार कराबद्दल करणार मोठी घोषणा; सामान्यांना दिलासा?

याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. आता मोदी सरकार इनकम टॅक्समध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : आर्थिक मंदीच्या काळात उपाययोजना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. आता सरकार इनकम टॅक्सच्या मर्यादेत बदल करण्याचा विचार करतंय. इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सने 19 ऑगस्टला आपला अहवाल दिला होता. या अहवालामध्ये मागणी वाढवण्यासाठी इनकम टॅक्समध्ये कपात करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळेच या शिफरसींनुसार इनकम टॅक्सच्या स्लॅबमध्ये मोठे बदल होऊ शकतात. काय होऊ शकतो बदल? 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या हा कर 20 टक्के आहे. 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर 30 टक्के कर लावण्याची शिफारसही करण्यात आली आहे. सध्या 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के इनकम टॅक्स लावला जातो. ही करकपात केली तर मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती येईल. ज्या लोकांचं उत्पन्न 2 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना 35 टक्के कर लावला पाहिजे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. CNBC-TV18 ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं. थॉमस कुक ट्रॅव्हल कंपनी एका रात्रीत बंद, 6 लाख पर्यटक अडकले इनकम टॅक्सवर सरचार्ज आणि सेस हटवण्याची शिफारस करण्यात आली आहे. करकपात केली तर मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्था सुधारायला मदत होईल, असं या अहवालात म्हटलं आहे. याआधी निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याचीही घोषणा केली आहे. यामुळे कंपन्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. ===================================================================================== VIDEO: थोडी वाट बघा… मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या